किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.87° से.
26.45°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलसरकारी समितीचा इशारा,
नवी दिल्ली, १८ डिसेंबर – कोरोनाची तिसरी लाट जानेवारी-फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे. मात्र, दुसर्या लाटेच्या तुलनेत ही सौम्य राहील, असा इशारा कोरोनावरील राष्ट्रीय सुपरमॉडेल समितीने दिला आहे.
ओमिक्रॉनमुळे डेल्टा अधिकच प्रबळ ठरेल आणि त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात होईल, असे या समितीचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी सांगितले. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढली असल्याने दुसर्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य राहण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात दररोज ७,५०० बाधित आढळत असले तरी, ओमिक्रॉनमुळे डेल्टा व्हेरिएंटला प्रबळ झाल्यास बाधितांची संख्या वाढेल, असे विद्यासागर यांनी सांगितले.
तिसरी लाट देशात धडकल्यास अत्यंत वाईट परिस्थितीत दररोज आढळणार्या बाधितांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता नाही. हा एक अंदाज असून, भाकीत नाही. देशातील लोकांना या विषाणूचा संसर्ग कितपत होतो, याची माहिती हाती आल्यावर आम्ही अंदाज व्यक्त करू शकतो, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने १ मार्चपूर्वी लसीकरण मोहीम सुरू केली. त्यावेळी डेल्टा व्हेरिएंटने धडक दिली होती. ज्यांनी लस घेतली नव्हती, ते मोठ्या प्रमाणात या व्हेरिएंटमुळे मृत्युमुखी पडले. देशात ७५ ते ८० टक्के प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. या दोन घटकांमुळे तिसरी लाट कमी घातक राहील, अशी शक्यता असल्याचे सांगितले.