किमान तापमान : 27.6° से.
कमाल तापमान : 27.86° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.86° से.
26.55°से. - 30.67°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.11°से. - 28.8°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलदोन हजार किमीची मारकक्षमता,
बालासोर, १८ डिसेंबर – भारताने आज शनिवारी अण्वस्त्रवाहू अग्नी-पी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम चाचणी केंद्रावरून ही चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने आज दिली.
अत्याधुनिक आणि अचूक मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत झाली आहे. दोन हजार किलोमीटर अंतरापर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे, असे डीआरडीओने म्हटले आहे.
अग्नी प्राईम असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, पूर्वीच्या तुलनेत त्यात अलिकडील काळात बरेच बदल करण्यात आले आहेत. चाचणीचे सर्वच निकष या क्षेपणास्त्राने पूर्ण केले आहेत, असे डीआरडीओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. डीआरडीओनच या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. आज सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. समुद्रात यासाठी लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. काही क्षणातच क्षेपणास्त्राने त्याचा अचूक वेध घेतला, असे यात नमूद आहे.
संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. या चाचणीमुळे भारताची संरक्षण क्षमता कितीतरी पटीने मजबूत झाली आहे, असे ट्विट त्यांनी केले.