|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.22° से.

कमाल तापमान : 29.4° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 62 %

वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.4° से.

हवामानाचा अंदाज

27.28°से. - 31.31°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.55°से. - 30.67°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.59°से. - 29.65°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.06°से. - 29.94°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.13°से. - 30.01°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.19°से. - 29.62°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » संघ हा सरकारचा रिमोट नाही

संघ हा सरकारचा रिमोट नाही

डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन,
धर्मशाळा, १८ डिसेंबर – केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे, अशा प्रकारचे चित्र प्रसारमाध्यमांकडून रंगविण्यात येत असते. मात्र, यात कुठलीही सत्यता नाही, अशी स्पष्ट भूमिका रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज शनिवारी येथे मांडली.
भारत ही जागतिक महासत्ता नाही, पण कोरोना महामारीनंतरच्या काळात आपला देश जगद्गुरू होऊ शकतो, इतकी क्षमता आपल्या देशात आता निर्माण झाली आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. येथे माजी सैनिकांना ते मार्गदर्शन करीत होते.
प्रसारमाध्यमांकडून संघाला वारंवार केंद्र सरकारचा रिमोट कंट्रोल असे संबोधले जात असते. यात काहीच तथ्य नाही. आमचे काही स्वयंसेवक निश्‍चितच केंद्र सरकारचा भाग आहेत. मात्र, या स्वयंसेवकांना सरकार कधीच कुठलेही आश्‍वासन देत नसते आणि स्वयंसेवकदेखील सरकारला कधीच कुठल्या सूचना करीत नसतात. लोक आम्हाला विचारतात की, तुम्हाला सरकारकडून काय मिळाले. यावर माझे उत्तर हेच असते की, आम्ही सरकारला कधीच काही मागत नाही, त्यामुळे मिळविण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
औषधशास्त्रामधील भारताच्या प्राचीन परंपरेवर प्रकाश टाकताना, डॉ. मोहनजी म्हणाले की, काढा, वनौषधी आणि आरोग्यशास्त्र या आपल्या औषधांचे महत्त्व आज संपूर्ण जगाला पटलेले आहे आणि कोरोनाच्या संकटात संपूर्ण जग यासाठी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आपला देश कदाचित जागतिक महासत्ता बनू शकणार नाही, पण जगद्‌‌गुरू बनण्याची क्षमता आपल्यात नक्कीच निर्माण झाली आहे.
एकतेचे बळ केले विशद
देशात एकता असणे अतिशय आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक आक्रमणकार्‍यांनी आपल्या देशावर आक्रमण केले. लढाया झाल्या, यात आपला पराभव झाला; कारण आपले नागरिक एकत्र नव्हते. हे आक्रमणकर्ते शक्तिशाली होते म्हणून आपण हरलो, असे नव्हे तर आपली दुर्बलता कारणीभूत ठरली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील नेमके हेच विशद केले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले. डॉ. मोहनजी भागवत सध्या हिमाचल प्रदेशच्या पाच दिवसांच्या भेटीवर आहेत. या भेटीत ते तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
जनरल रावत यांना श्रद्धांजली
यावेळी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी अलिकडेच हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती सीडीएस जनरल बिपीन रावत आणि अन्य १३ अधिकार्‍यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

Posted by : | on : 18 Dec 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g