किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमित शाह यांचा इशारा,
अहमदनगर, १८ डिसेंबर – डबघाईस आलेल्या जिल्हा बँका आणि मोडकळीस आलेल्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार असून, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचा इशारा केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दिला. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते.
अमित शाह महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. यावेळी शाह यांनी राज्यातील सहकार क्षेत्राला गर्भित इशारा दिला. यापुढे खाजगी साखर कारखाना होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्यांना हमी देताना राजकारण करू नका, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सहकार चळवळीतून उभ्या राहिलेल्या जिल्हा बँका व अनेक सहकारी साखर कारखाने डबघाईला आले आहेत. सहकारी साखर कारखाने खाजगी करून काही नेत्यांनी खरेदी केले. त्यामुळे सहकार खाते सहकारातून समृद्धीकडे जाण्याऐवजी मोडकळीस आले. पूर्वी केंद्रात सहकार खाते नव्हते. सहकार क्षेत्र हे ठराविक राज्यापुरते आणि क्षेत्रापुरते मर्यादित असताना केंद्र पातळीवरील सहकार खाते कोणत्या दृष्टीने विचार करीत आहे, हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तोडायला नव्हे, जोडायला आलो
जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याने सध्या त्या संकाटात आल्या आहेत. या बँकांना संकटातून बाहेर काढणार आहोत. महाराष्ट्रात संकटात असलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा उभे करण्याचे काम आम्ही करू. पुन्हा कोणताही सहकारी कारखाना खाजगी होणार नाही, याची दक्षता घेऊ, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात काय होणार, सहकार क्षेत्रात काय होणार, असे प्रश्न मी सहकारमंत्री झाल्यावर विचारण्यात आले. मात्र, मी येथे तोडायला नव्हे तर, जोडायला आलो असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
राज्य सरकारला फटकारले
राज्य सरकार केवळ काही कारखान्यांचे प्रश्न सोडवते. विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांना सरकार सहकार्य करीत नाही. काही जणांना यासाठी दिल्लीला यावे लागले. राज्य सरकारने सहकारी क्षेत्रात राजकारण न करता संकटात सापडलेल्या कारखान्यांना मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
समित्यांच्या भानगडीत पडणार नाही
आम्ही बँक क्षेत्राला वाचवण्यासाठी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही कोणताही कमिटी अथवा समिती नेमणार नाही. आजवर भरपूर समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांचे अहवाल धूळखात पडून राहिले. त्यामुळे सहकार चळवळ वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या स्थापन करणार नाही, असे अमित शाह म्हणाले.