किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलश्रीनगर, १९ डिसेंबर – येथील हरवान परिसरात आज रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी अतिरेक्याचा खात्मा केला.
परिसरात अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी हरवान परिसराला वेढा दिला. जवानांना पाहताच पळ काढताना अतिरेक्याने जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात तो ठार झाला. सैफुल्ला उर्फ अबू खालिद असे ठार झालेल्या अतिरेक्याचे नाव असून, तो पाकिस्तानातील कराचीचा रहिवासी आहे. त्याने २०१६ मध्ये काश्मिरात घुसखोरी केली होती. तो हरवान परिसरात सक्रिय होता आणि कित्येक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होता, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी ट्विटरवर दिली. मागील ३३ दिवसांत ठार करण्यात आलेला हा दुसरा पाकिस्तानी अतिरेकी आहे.
अनंतनागमध्ये अतिरेक्याला अटक
अनंतनाग जिल्ह्यातील के. पी. रोडवर लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने अल्-नूर मशिदीत कारवाई करून अतिरेक्याला अटक केली. फिरोझ अहमद झरगर असे त्याचे नाव असून, तो कुलगाम जिल्ह्यातील ग्राटाबाल किमोह येथील रहिवासी असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. २०१७ मध्ये सुरक्षा दलाने अरवानी येथे ठार केलेला तोयबाचा कमांडर माजिद झरगरचा तो लहान भाऊ आहे.
हेरगिरीच्या आरोपात दोघांना अटक
जम्मू : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजौरीतील दोघांना अटक करण्यात आली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने लष्करातील हमाल आणि त्याच्या नातेवाईकाला शनिवारी रात्री अटक केली. ते दोघेही नौशेरा येथील रहिवासी आहेत. सुरक्षा आस्थापनांतील संवेदनशील भागांचे चित्रीकरण करून ते पैशांच्या मोबदल्यात त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांना सोपवण्याचा आरोप या दोघांवर आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.