किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादललष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन,
पुणे, २० डिसेंबर – कोरोना महामारीने आपल्याला बरेच धडे शिकवले आहेत आणि यासारख्या महामारी हाताळण्यासाठी क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज सोमवारी केले.
बिमस्टेक देशांसाठी आपत्ती व्यवस्थापन पैलूंमध्ये संयुक्तता वाढवणे आणि क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने येथे दोन दिवसीय पानेक्स-२१ या बहुराष्ट्रीय आणि बहुसंस्था परिषदेचे उद्घाटन नरवणे यांच्या हस्ते झाले. जगभराला तडाखा दिलेल्या कोरोनाने आपल्याला प्रतिबंधात्मक नियंत्रण, शमन धोरण आणि मार्गदर्शक नियमांसारखे कित्येक धडे शिकवले आहेत, असे नरवणे यांनी सांगितले.
२०१९ च्या अखेरीस कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या मोठ्या आपत्तीचे आपण साक्षीदार आहोत. या महामारीचा प्रकोप अद्याप काही देशांमध्ये सुरू आहे. एप्रिल-मे या कालावधीत आलेल्या दुसर्या लाटेचा गंभीर प्रभाव भारताने पाहिला आहे. या लाटेत कित्येकांचे प्राण गेले. कोरोना महामारीने आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि याचा प्रभाव लवकरात लवकर कमी करण्यासाठी जागतिक समुदायाला एकत्र आणले आहे, असे नरवणे यांनी सांगितले.
नागरिकांचे लवकर लसीकरण करण्यासाठी विविध लसी आणि लसीकरण मोहिमेचा विकास हे या संदर्भातील एक मोठे पाऊल आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जागतिक समुदाय परस्परांना मदत करीत असल्याचे आपण साक्षीदार आहोत. या कठीण काळात केवळ परस्परांना सहकार्यच करण्यात आले नाही तर, या महामारीचा फटका बसलेल्या देशांना औषधांचा पुरवठा व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मदतही करण्यात आली, असे नरवणे यांनी सांगितले.