|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.15° से.

कमाल तापमान : 29.71° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 54 %

वायू वेग : 5.36 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.71° से.

हवामानाचा अंदाज

26.7°से. - 30.99°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.58°से. - 29.57°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 29.46°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.58°से. - 29.59°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.84°से. - 29.31°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.75°से. - 28.84°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणीच पोहोचले!

पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणीच पोहोचले!

फळ विकून सुरू केली शाळा,
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यात कर्नाटकच्या मंगळुरूचे रहिवासी आणि व्यवसायाने फळ विक्रेते असलेले ६४ वर्षीय हरेकला हजब्बा यांचाही समावेश होता. हरकेला हजब्बा यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी हरेकला राष्ट्रपतींजवळ पोहचले, तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. उल्लेखनीय म्हणजे, देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ स्वीकारण्यासाठी हरेकला हजब्बा अनवाणीच राष्ट्रपतींसमोर उपस्थित झाले.
अत्यंत साध्या कपड्यांत राहणार्‍या हरेकला हजब्बा यांना शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले. हजब्बा संत्र्यांची विक्री करून आपले पोट भरतात. स्वत: निरक्षर असूनही शिक्षणाचे महत्त्व समजणारे हजब्बा यांनी आपल्या आयुष्यभराच्या तुटपुंज्या मिळकतीतून बंगळुरूजवळच असलेल्या आपल्या गावात २००० मध्ये एक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केली. बंगळुरूपासून ३५० किलोमीटर अंतरावर स्थित न्यू पाडपू गावात पोहोचण्यासाठी साधे रस्तेही नाहीत. परंतु, हजब्बा यांनी उभारलेल्या शाळेत जवळपास १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २००० पर्यंत या गावात एकही शाळा अस्तित्वात नव्हती. दिवसभर राबून १५० रुपयांपर्यंत कमाई करू शकणार्‍या हरेकाला हजब्बा यांनी आपल्या मेहनतीच्या कमाईतून एक एकर जमिनीवर कन्नड जिल्हा पंचायत हायस्कूल या नावाने शाळा सुरू केली.
शाळा सुरू करताना त्यांना आर्थिक समस्यांसह इतर अडचणींचाही सामना करावा लागला. सुरुवातीला त्यांना कुणाचेही सहकार्य मिळाले नाही. मात्र, परिसरात असलेल्या एका मशिदीला लागूनच असलेल्या मदरशात त्यांनी आपली शाळा सुरू केली. या शाळेत २८ मुलांना शिक्षण घेताना पाहून हजब्बा यांना हुरूप आला. त्यामुळे मुलांसोबत त्यांनीही शिक्षण घेणे सुरू केले. काही वर्षानंतर इथे शाळेची लहानशी इमारत उभी राहिली. मुलांची संख्या वाढल्यानंतर प्रसंगी कर्ज काढून त्यांनी हा खर्च केला. हजब्बा यांचे हे निस्वार्थी प्रयत्न पाहून काही जण त्यांच्या मदतीला समोर आले. तर स्थानिक वर्तमानपत्रांनी दखल घेतल्यानंतर राज्य सरकारकडून हजब्बा यांना एक लाख रुपयांचा मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला.

Posted by : | on : 9 Nov 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g