किमान तापमान : 29.32° से.
कमाल तापमान : 33.1° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 35 %
वायू वेग : 4.92 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.1° से.
26.7°से. - 34.99°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर कुछ बादल25.76°से. - 29.61°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.53°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.55°से. - 29.52°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.81°से. - 28.84°से.
रविवार, 24 नोव्हेंबर साफ आकाशलष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – संघर्षाच्या काळात भारतीय लष्कराला केवळ स्वदेशी तंत्रज्ञान उपलब्ध असेल आणि संरक्षण आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच विदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज सोमवारी केले.
भारतीय लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण केले जात आहे आणि कारवायांच्या गरजेसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक झाले आहे, असे त्यांनी औद्योगिक संघटना फिक्कीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले. संघर्षाच्या काळात किंवा युद्धसदृश परिस्थितीत सर्वच क्षेत्रांत वापर करण्यासाठी केवळ स्वदेशी तंत्रज्ञानच आपल्यासाठी उपलब्ध असेल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि विदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे आणि स्थानिक क्षमता वाढवणे आवश्यक आहे. विशेषतः लष्कर या उपक्रमाचे नेतृत्व करण्यास अनुकूल आहे. भारताने औद्योगिक पायाचा विस्तार केला आहे आणि संरक्षण उपकरणांची गरज देशातूनच स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भागवणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय लष्करात संरक्षण उपकरणांचे सरासरी खरेदी मूल्य कमी आहे. त्यामुळे यात सहभागी होण्याची संधी देशातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग आणि स्टार्ट-अप्सला प्राप्त झाली आहे. आर्थिक मंदीच्या काळात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारतासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे देशातील उद्योगांना आवश्यक असलेली भरभराट मिळाली, असे मनोज नरवणे यांनी सांगितले.
गुणवत्ता आणि खर्च महत्त्वाचे मुद्दे
उपकरणे आणि तंत्रज्ञान खरेदी करताना गुणवत्ता आणि खर्च हे दोन मुद्दे भारतीय लष्करासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत, असे या कार्यक्रमात संबोधित करताना उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल शंतनू दयाल यांनी सांगितले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत ही उपकरणे आपश तैनात करीत आहोत. त्यामुळे ती अत्यंत मजबूत आणि चांगल्या दर्जाची असावीत. भारतीय लष्कर संरक्षण उपकरणांच्या खरेदीत स्वदेशी उपकरणांचे प्रमाण वाढवत आहे, असेही त्यांनी सांगितले.