किमान तापमान : 31.05° से.
कमाल तापमान : 32.34° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 1.58 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.34° से.
26.15°से. - 32.99°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.15°से. - 29.97°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.09°से. - 29.93°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.93°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.59°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.37°से. - 29.3°से.
रविवार, 24 नोव्हेंबर साफ आकाशलसीकरण झालेल्यांना लाभ,
नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – भारतीय प्रवाशांचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध हटवत लसीकरण झालेल्या प्रवाशांना अमेरिकेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ झालेले आदित्य गर्ग हे भारतातील पहिले प्रवासी ठरले आहेत.
आदित्य गर्ग हे मूळचे राजस्थानातील जयपूरचे आहेत. ते कॅलिफोर्नियातील इलेक्ट्रिक वाहनांच्या कंपनीत आहेत. त्यांच्यासह इतर काही प्रवाशांनी आज सकाळी पहिल्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केले. कोरोना महामारीमुळे मागील वर्षी अमेरिकेने भारतासह कित्येक देशांतील प्रवाशांना बंदी घातली होती. त्यानंतर हे निर्बंध शिथिल करताना अमेरिकेने व्हिसाच्या काही श्रेणींमधील प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली होती.
संपूर्ण लसीकरण झालेल्यांवरील निर्बंध अमेरिकेने आज सोमवारपासून मागे घेतले आहेत. यात भारताचाही समावेश असून, प्रवाशांना उड्डाण करण्यापूर्वी कोरोनाचा नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.
आदित्य गर्ग यांनी आज पहाटे ४.३० वाजताच्या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाने अमेरिकेला प्रयाण केले. कोरोना महामारीमुळे अमेरिकेत मागील वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी करण्यात आली. त्यापूर्वी अमेरिकेचा प्रवास केला होता, असे त्यांनी सांगितले.