किमान तापमान : 29.22° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 39 %
वायू वेग : 3.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
26.53°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलआगामी विधानसभा निवडणुका जिंकणारच,
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – भाजपा हा घराणेशाही जोपासणारा पक्ष नाही. सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर चालणारा आणि सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणारा हा पक्ष आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास यातील सेतू व्हावे. विश्वास ठेवा, पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय भाजपाचाच होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले.
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत समारोपीय मार्गदर्शन करताना पंतप्रधान बोलत होते. या बैठकीत उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या भाजपाशासित मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी तेथील निवडणुकीच्या तयारीबाबतचे सादरीकरण केले. पंजाब भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनीही त्या राज्यातील स्थितीची माहिती बैठकीत सादर केली.
निवडणुकांमध्ये विजयी होण्याचा एकच मंत्र आहे आणि तो म्हणजे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील सेतू बनून कार्य करावे. भाजपाने नेहमीच सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावरच भर दिला आहे आणि हाच पक्षाचा आजवरचा इतिहास राहिला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पत्रपरिषदेत याबाबतची माहिती दिली.
देशाच्या राजकारणात भाजपाने आजवर जे यश मिळवले आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे जनतेशी जुळलेली नाळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कष्ट, परिश्रमातून पुढे गेलो
भाजपा हा घराणेशाहीवर आधारित पक्ष नाही. सेवा, दृढनिश्चय आणि समर्पण या मूळ संकल्पनेशी पक्ष जुळलेला आहे. कुठल्या एका घराण्याशी जुळलेला नाही. पक्षाच्या परंपरा जोपासत कष्ट आणि परिश्रम यामुळेच आपण पुढे गेलो आहोत. भाजपा कार्यकर्त्यांनाही आगामी काळात याच विश्वासाने आणि आपलेपणाच्या भावनेने पुढे जायचे आहे. विश्वास ठेवा, हाच विजयाचा एकमात्र मार्ग आहे, असा मंत्र पंतप्रधान मोदी यांनी दिला.
पंजाब निवडणुकीत भाजपा सर्व जागा लढवणार
पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वच ११७ जागा लढवेल, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी बैठकीत केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्व जागा लढविणार आहे आणि पंजाबमध्ये भाजपाचाच विजय होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंजाबमधील राजकीय स्थितीची माहिती दिली.
अडवाणी, डॉ. जोशी यांची आभासी उपस्थिती
तब्बल दोन वर्षांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. मोदी सरकारच्या सलग दुसर्या कार्यकाळातील ही पहिलीच बैठक असल्याने यात पक्षाचे बहुतांश सर्वच दिग्गज नेते सहभागी झाले होते. मात्र, कोरोनामुळे लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आभासी पद्धतीने बैठकीत आपला सहभाग नोंदविला. राज्यस्तरावरील अनेक नेत्यांनी आभासी पद्धतीनेच बैठकीला हजेरी लावली.
कोरोना काळात लोकसेवाच केली
देशावर कोरोनाचे संकट आले. मात्र, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सरकारने फक्त लोकसेवेचेच व्रत स्वीकारले होते. उद्योग बंद पडले, असंख्य लोक बेरोजगार झाले. अशा स्थितीतही कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली. देशातील ८० कोटी सामान्य नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले. भविष्यातही भाजपा केवळ लोकसेवाच करणार आहे. भाजपाचे राजकारण सत्तेसाठी नसून, लोकसेवेसाठी आहे, असेही मोदी यांनी सांगितले.