|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.4° से.

कमाल तापमान : 29.22° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 45 %

वायू वेग : 3.76 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.4° से.

हवामानाचा अंदाज

26.94°से. - 31.14°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.12°से. - 30.05°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.19°से. - 29.98°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.2°से. - 29.96°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.23°से. - 29.78°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.26°से. - 29.34°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » आयआरसीटीसीची रामायण यात्रा सुरू

आयआरसीटीसीची रामायण यात्रा सुरू

दुसरी यात्रा १६ नोव्हेंबरपासून,
मुंबई, ७ नोव्हेंबर – इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आज रविवारपासून रामायण यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेतील पहिली ट्रेन आज रविवारी नवी दिल्ली येथील सफदरजंग रोड रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. १७ दिवसांच्या यात्रेत ही रेल्वे अयोध्या, सीतामढी आणि चित्रकूटसह इतरही काही स्थानांवर जाणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने रामायण यात्रेची योजना तयार केली आहे. या यात्रेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासही मदत होईल. सरकारने त्यासाठी रामायण सर्किटवर काम सुरू केले आहे. या सर्व स्थळांवर रेल्वेद्वारे यात्रा करता येऊ शकणार आहे.
दक्षिण भारतातील धार्मिक पर्यटन लक्षात घेत आयआरसीटीसीने श्री रामायण यात्रा-मदुराईचेही आयोजन केले आहे. ही ट्रेन मदुराईपासून सुरू होऊ हम्पी, नाशिक, चित्रकूट, अलाहाबाद, वाराणसी जाईल आणि तिथून परत येईल. ही ट्रेन १६ नोव्हेंबरला रवाना होणार आहे. याशिवाय श्री रामायण यात्रा एक्सप्रेस-श्री गंगानगर २५ नोव्हेंबरला रवाना होईल. ही यात्रा एकप्रकारे धार्मिक हॉलिडे पॅकेज आहे. यात आयआरसीटीसी तुम्हाला प्रभू श्रीरामाशी संबंधित धार्मिक स्थळांची यात्रा घडवेल.
जर तुम्ही रामायण सर्किटशी संबंधित जागांवर जाऊ इच्छित असाल आणि धार्मिक पर्यटन करू इच्छित असाल, तर हे पॅकेज खूप उपयुक्त ठरेल. यात तुम्ही आरामशीर आणि कमी बजेटमध्ये यात्रा करू शकाल. या प्रकारची एक रामायण रात्रा या वर्षी झाली आहे. त्यात अयोध्या, नंदीग्राम, श्रृंगवेरपूर, चित्रकूट आदी स्थळांना भेट देण्यात आली होती. ६ दिवस आणि ५ रात्रीच्या या यात्रेला प्रति व्यक्ती एकूण खर्च ६ हजार ९३० रुपये आला होता.
८०० जागा, १५ दिवस…!
अशाच प्रकारे आता आयआरसीटीसी रामायण यात्रेची एक ट्रेन श्री रामायण एक्सप्रेस चालवणार आहे. ही रेल्वे तामिळनाडूतील मदुराईवरून १६ नोव्हेंबरला प्रस्थान करेल. ही रेल्वे रामायणातील उल्लेख असलेल्या प्रमुख स्थळांवरून जाईल. ही ८०० जागा असलेली एकूण १५ दिवसांची यात्रा पूर्ण झाल्यावर ती तामिळनाडूतील रामेश्‍वरला पोहोचेल. ही रेल्वे प्रभू श्री रामाशी संबंधित सर्व प्रमुख स्थळांवरून जाईल. रेल्वे भारतातील रामायण सर्किटसह नेपाळ आणि श्रीलंकेलाही जाईल. मदुराईवरून चालणार्‍या रेल्वेचे तिकीट १५ हजार ८३० रुपये असणार आहे.

Posted by : | on : 7 Nov 2021
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g