किमान तापमान : 26.21° से.
कमाल तापमान : 26.65° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.21° से.
25.99°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलराहुल गांधींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद,
चेन्नई, ७ नोव्हेंबर – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी आपली दिवाळी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमात सामायिक झाला. या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारले की, जर सरकार स्थापन झाले, तर पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घेणार, तेव्हा त्यांनी महिलांना आरक्षण देऊ, असे म्हटले आहे.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक नृत्यही केले. आमच्यात खूप मनोरंजक संभाषण झाले व त्यांच्यासोबत एकत्र जेवण केले. या भेटीने दिवाळी अधिक विशेष झाली. संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे व ती आपण वाचवली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी सेंट जोसेफ स्कूल मूलगुमुदन, तामिळनाडूला भेट दिली होती व तेथून ते काही दिवसांपूर्वी दिल्लीत आले होतो, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवाल, तर मी नम्रता म्हणेन, कारण नम्रतेने तुम्हाला समज येते. रात्रीच्या जेवणात काय घ्यायचे आहे, अशी विचारणाही राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना केली. यानंतर त्यांनी स्वत:च सुचवले की आपण इथे छोले भटुरा खाण्याची व्यवस्था करूया का?
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि पंतप्रधानांच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये असून ब्रेकही निकामी झाल्याची टीका त्यांनी केली. एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे लाखो कुटुंबांना स्टोव्ह पेटवावा लागत असल्याचे त्यांनी बातमीचा हवाला देत म्हटले.