किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 26.62° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.99°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलनवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या रविवारी महत्त्वाची बैठक होणार असून, पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची रणनीती यात ठरवली जाणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथमच ही बैठक होत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी आज शनिवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांसह राष्ट्रीय कार्यकारिणीचे १२४ सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. कोरोनाकाळानंतर प्रथमच ही बैठक प्रत्यक्ष उपस्थितीत होत आहे.
देशापुढील महत्त्वाचे मुद्देही या बैठकीत चर्चेत येणार असून, पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुका हादेखील बैठकीचा मुख्य विषय राहणार आहे, असे अरुण सिंह यांनी सांगितले. जे. पी. नड्डा उद्घाटनीय संबोधन करतील, तर बैठकीचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. या बैठकीत एक राजकीय ठरावही पारित केला जाणार असल्याचे ते म्हणाले. अलिकडेच विधानसभेच्या २९ आणि लोकसभेच्या ३ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात पश्चिम बंगालमधील काही जागा भाजपाला गमवाव्या लागल्या. या अनुषंगानेही बैठकीत रणनीती तयार केली जाणार आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानावर प्रदर्शनी
या बैठकीच्या स्थळी पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत अभियानाची माहिती देणारी प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या काळात सरकारने उचललेल्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहितीही यातून दिली जाणार आहे.