किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.05° से.
26.87°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलरायपूर, ६ नोव्हेंबर – भगवान श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या उत्तरप्रदेशातील अयोध्येत साजरा होत असलेल्या भव्य दीपोत्सवाची देशभरात चर्चा होत आहे. भगवान श्रीरामाची आई कौशल्या यांचे जन्मस्थान असलेल्या गावामध्येही यंदा भव्य दीपोत्सव झाला आहे. भगवान रामाचे आजोळ छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील चंदखुरी येथे असल्याचे मानले जाते.
चंदखुरी येथील माता कौशल्या मंदिरात छत्तीसगड राज्याच्या इतिहासात प्रथमच दिवाळीचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला. दीपोत्सवांतर्गत गुरुवारी सायंकाळी माता कौशल्येचे मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले. मंदिरात एकाचवेळी ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. हे दिवे लावण्यासाठी १८०० लिटर तेलाचा वापर करण्यात आला. चंदखुरी येथील माता कौशल्या मंदिराचे मुख्य पुजारी पंडित रमेश कुमार चौबे म्हणाले, आतापर्यंत मंदिरात अशा दीपोत्सवाचे आयोजन पाहिले नव्हते. या मंदिरात एकेकाळी लोक हे फक्त वर्षातून दोनदाच येत होते. एकदा मंदिराच्या रंगकामासाठी आणि दुसर्यांदा चैत्र नवरात्रीच्या वेळी घरात यज्ञ करताना माता कौशल्याच्या नावाने पेटवण्यात आलेली ज्योत मंदिरात ठेवण्यासाठी. या मंदिराशेजारी काटेरी झुडपे असायची. १९९० मध्ये चैत्र नवरात्रीपासून गावातील १२ जणांनी मंदिरात १२ ज्योत लावण्यास सुरुवात केली.