किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलरक्सौल, ६ नोव्हेंबर – केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात केलेल्या कपातीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडीफार कपात झाली असली, तरी सामान्य सणासुदीच्या दिवसांतही महागाईच्या आगीत होरपळताना दिसत आहेत. याच दरम्यान भारत आणि नेपाळच्या सीमेवरील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी थेट नेपाळ गाठत असल्याचे दिसून येत आहे.
याचे कारण म्हणजे, नेपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतापेक्षा खूपच कमी आहेत. त्यामुळे सीमावर्तीय भागातील भारतीय नागरिक इंधन भरण्यासाठी नेपाळच्या पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत.
नेपाळच्या सीमेलगत असलेल्या बिहारच्या रक्सौलमध्ये पेट्रोलचे दर १०७.९२ रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ९२.९८ पैसे प्रती लीटर आहेत. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्क तर राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर रक्सौलमध्ये इंधनाच्या या किमती आहेत.
दरम्यान, नेपाळमध्ये पेट्रोल २५.१७ रुपयांनी तर डिझेल २०.९५ रुपयांनी स्वस्त आहे. रक्सौलच्या बाजूलाच असलेल्या नेपाळच्या हद्दीतील पर्सा जिल्ह्यात एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना १३२.२५ नेपाळी रुपये अर्थात् ८२.६५ भारतीय रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलच्या एका लीटरसाठी ११५.२५ नेपाळी रुपये म्हणजे ७२.०३ भारतीय रुपये मोजावे लागत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, बिहार आणि नेपाळच्या सीमावर्तीय भागांत व्यावहारिकरित्या नेपाळी चलन मोठ्या प्रमाणात वापरले जाते.