किमान तापमान : 25.66° से.
कमाल तापमान : 27° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.66° से.
24.59°से. - 27.86°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.68°से. - 29.16°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.99°से. - 29.58°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.88°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.62°से. - 29.11°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल– निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस,
– काँग्रेस नेत्यांवर खजुराहो येथे आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकरण दाखल,
नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ’पनौती’ आणि ’जेबकतरा’ संबंधित टिप्पण्यांसाठी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राजस्थान निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ’पीएम म्हणजे पनौती मोदी’ असे म्हटले होते. क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी दुर्दैवाशी संबंधित हा शब्द वापरला होता. सामन्यातील पराभवानंतर ’पनौती’ हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
या सामन्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये उपस्थित होते. या स्टेडियमला पंतप्रधान मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोदी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवतात, तर उद्योगपती अदानी आपले खिसे भरतात, असा आरोप राहुल यांनी केला. ते म्हणाले की मोदी टीव्हीवर येतात आणि ’हिंदू-मुस्लिम’ म्हणतात आणि कधी क्रिकेट सामन्यांना जातात. त्यांनी पनौतीचा पराभव केला ही वेगळी बाब आहे.’’ काँग्रेस नेते म्हणाले, ’’पीएम म्हणजे पनौती मोदी.’’ राहुल यांची ही टिप्पणी काही दिवसांपूर्वी आली होती.
काँग्रेस नेत्यांवर आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकरण
भोपाळ, – पक्षनेत्याच्या हत्या प्रकरणात खजुराहो पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केल्याने काँग्रेस नेत्यांवर आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकरण दाखल करण्यात आले. यात दिग्विजयसिंह, आमदार विक्रमसिंह आदींचा समावेश आहे. माहितीनुसार, मध्यप्रदेशात मतदानाच्या दिवशी अर्थात् १७ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका पक्ष कार्यकर्त्यांची वाहनाखाली चिरडून हत्या करण्यात आली होती. ही घटना विधानसभा निवडणुकीतील उमेदवार विक्रमसिंह यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर काही मिनिटांत घडली होती.
यानंतर पोलिस भाजपा पक्षाच्या उमेदवारासह एकूण २१ कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला. दुसरीकडे घटनेच्या दुसर्याच दिवशी १८ नोव्हेंबरला वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी खजुराहो पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्याच्या शवासह धरणे दिले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दिग्विजयसिंह, राजनगर विद्यमान आमदार तसेच उमेदवार विक्रमसिंह यांच्यासह एकूण ७० जणांविरुद्ध कलम १८८ अंतर्गत आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकरण दाखल केले.