किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– आयआयटी गुवाहाटी येथे रविवारी भरती मोहिम,
नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी गुवाहाटी येथे रविवारी भरती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत, आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना ३०२ ऑफर मिळाल्या आहेत. या प्री प्लेसमेंट ऑफरमध्ये (पीपीओ), आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विद्यार्थ्यांना ही ऑफर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात मंदी असल्याचे समोर येत आहे, परंतु प्री-प्लेसमेंट ऑफर्समध्ये असे काहीही दिसले नाही.
माहिती देताना, आयआयटी गुवाहाटीच्या सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंटच्या प्रमुख ललाती मोहन पांडे यांनी सांगितले की, पाच आयआयटीमधील ५० विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिकच्या ऑफर मिळाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १.१० कोटी रुपयांची ऑफर प्राप्त झाली. या सर्व ऑफर प्री प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) अंतर्गत प्रदान करण्यात आल्या आहेत. प्री प्लेसमेंटमध्ये सिस्को, मयक्रोसोफ्ट, पी अंड जी, ओर्याकल, टेक्सास इंस्ट्रूमेंट्स, जेपीएमसी, अमेरिकन एक्सप्रेस, आयटीसी, मास्टरकार्ड, केएलए-टेनकोर आणि गोल्डमन इत्यादी कंपन्यांना प्री प्लेसमेंट ऑफर देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी आयआयटी गुवाहाटीमध्ये प्री प्लेसमेंट्सची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी २१८ विद्यार्थ्यांना पीपीओ मिळाला होता, तर यंदा २१८ विद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ २१४ विद्यार्थ्यांना पीपीओ मिळाला आहे. आयआयटी गुवाहाटी च्या तुलनेत, आयआयटी बीएचयु मध्ये ३०२ पीपीओ प्राप्त झाले आहेत. या संस्थेला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पीपीओ मिळाले आहेत. एकूणच पीपीओ बद्दल बोलायचे तर, यावर्षी देशातील विविध आयआयटी मध्ये पीपीओ मध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.