|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

पन्नूच्या हत्येचा आरोप भारतीय धोरणांच्या विपरित

पन्नूच्या हत्येचा आरोप भारतीय धोरणांच्या विपरितनवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिकावर केलेल्या गंभीर आरोपावर भारताने उत्तर दिले आहे. भारताचा नागरिकाचा हत्येच्या एका कटाशी संबंध असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप अतिशय चिंताजनक आणि भारतीय धोरणांच्या विपरित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले. भारत सरकारचा कर्मचारी असलेला ५२ वर्षीय भारतीय नागरिकाने न्यू यॉर्क शहरातील एका नागरिकाच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप अमेरिकी न्याय विभागाने केला आहे. अमेरिकी न्याय...30 Nov 2023 / No Comment / Read More »

मोझांबिककडून भारताची ‘तूरकोंडी’

मोझांबिककडून भारताची ‘तूरकोंडी’– दरात तेजी राहणार, नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – भारतातील तूरटंचाईचा आणि जगभरातील तुरीच्या अल्प उपलब्धतेचा फायदा घेत मोझांबिकने भारताला होणार्या तूर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. अतिरिक्त नफ्यासाठी मोझांबिक भारताची ‘तूरकोंडी’ करण्याच्या प्रयत्नात आहे. देशांतर्गत बाजारात पुढील वर्षभर तुरीच्या दरात तेजी राहणार असली, तरीही फार दरवाढ होण्याची शक्यता नाही. इंडियन पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले की, मोझांबिक भारताला तूर निर्यात करणारा सर्वांत मोठा देश आहे. देशाच्या...30 Nov 2023 / No Comment / Read More »

जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताची अभूतपूर्व कामगिरी

जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताची अभूतपूर्व कामगिरीनवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – भारताने जी-२० च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन करून, जागतिक दक्षिणेचा आवाज वाढवून, विकासाला पाठिंबा देऊन आणि सर्वत्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी लढा देऊन विलक्षण कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्राझीलने १ डिसेंबरपासून जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारण्याआधी पंतप्रधान मोदींनी भारताच्या अध्यक्षतेखाली या प्रतिष्ठित गटाच्या भेटीवर प्रकाश टाकला आणि आपला देश आपल्या हितासाठी एकत्रितपणे काम करेल या आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवेल असा विश्वास व्यक्त केला.गुरुवारी...30 Nov 2023 / No Comment / Read More »

आम्ही अमेरिकन गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली आहे

आम्ही अमेरिकन गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली आहेनवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या दाव्यावर भारत सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, आम्ही अमेरिकन गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली आहे आणि तपासासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्यावर नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने संघटित गुन्हेगार, बंदूक चालवणारे, दहशतवादी आणि इतर यांच्यातील संबंधाशी संबंधित इनपुट शेअर केल्यानंतर भारताने एक...29 Nov 2023 / No Comment / Read More »

चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची प्रकरणे आली समोर

चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची प्रकरणे आली समोर– आरोग्य मंत्रालयाची चेतावणी, चीनमुळे भारतात अलर्ट, नवी दिल्ली, (२४ नोव्हेंबर) – चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या आजाराची प्रकरणे समोर आली असताना चीनसह संपूर्ण जग कोरोना महामारीतून अद्याप पूर्णपणे बाहेर आले नव्हते. हा आजार लहान मुलांना होतो. त्याची प्रकरणे उत्तर चीनमध्ये दिसून आली. तथापि, भारत सरकार चिनी मुलांमध्ये पसरणार्‍या एच९एन२ प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आरोग्य मंत्रालय एच९एन२ चा प्रादुर्भाव आणि चीनमधील मुलांमध्ये पसरणार्‍या श्वसनाच्या आजारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. आरोग्य...24 Nov 2023 / No Comment / Read More »

मोदी-ट्रुडो यांच्या आभासी भेटीपूर्वी मोठे पाऊल

मोदी-ट्रुडो यांच्या आभासी भेटीपूर्वी मोठे पाऊलनवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – भारत सरकारने कॅनडातील लोकांना दिलासा दिला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना दिलासा देत भारत सरकारने आता कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवेवर बंदी घातली होती. खरे तर कॅनडात दररोज हिंदू मंदिरांवर तसेच भारतीय नागरिकांवर हल्ले होत आहेत. या सर्व घटनांनंतरही भारताने कॅनडातील व्हिसा सेवा बंद केलेली नाही. पण काही काळापूर्वी...22 Nov 2023 / No Comment / Read More »

जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांमुळे भारत-कॅनडातील संबंध तणावग्रस्त

जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांमुळे भारत-कॅनडातील संबंध तणावग्रस्त– जयशंकर यांनी स्पष्ट केली आपली भूमिका, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष पेनी वोंग यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबद्दल जस्टिन ट्रूडो यांनी नवी दिल्लीवर केलेल्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडातील अनेक महिन्यांपासून तणावग्रस्त राजनैतिक संबंधांवर चर्चा केली. भारत-ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्र्यांच्या फ्रेमवर्क संवादानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, होय, मी आज मंत्री वोंग यांच्याशी याबद्दल बोललो. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे...21 Nov 2023 / No Comment / Read More »

राजनाथ सिंह-रिचर्ड मार्ल्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा

राजनाथ सिंह-रिचर्ड मार्ल्स यांच्यात द्विपक्षीय चर्चानवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्यामध्ये आज, २० नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झाली. उभय मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संयुक्त सराव, देवाणघेवाण आणि संस्थात्मक संवाद यांच्यासह दोन्ही देशांमधील लष्करांमधल्या सहकार्यामध्ये वाढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्रामध्ये जागरूकता यासाठी सहकार्य आणखी वाढवण्याचे...21 Nov 2023 / No Comment / Read More »

३२ टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दल पॅलेस्टाईनला रवाना

३२ टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दल पॅलेस्टाईनला रवानानवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी ३२ टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दलाचे दुसरे सी१७ विमान रविवारी इजिप्तच्या एल-अरिश विमानतळावर रवाना झाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गझनला मानवतावादी मदतीसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत देत राहू, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. भारतीय हवाई दलाचे दुसरे विमान ३२ टन मदत साहित्य घेऊन इजिप्तच्या एल-अरिश विमानतळाकडे रवाना...19 Nov 2023 / No Comment / Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक

भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठकनवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबतीने भारत-ऑस्ट्रेलिया २+२ मंत्रिस्तरीय संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स १९ ते २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात २० नोव्हेंबर रोजी संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक होणार आहे, त्यानंतर २+२ संवाद होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासोबत त्यांचे...19 Nov 2023 / No Comment / Read More »

जागतिक साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल

जागतिक साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल– दुसर्‍या व्हॉईस ऑफ ग्लोबल शिखर परिषदेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (१८ नोव्हेंबर) – जागतिक पुरवठा साखळ्या अधिक मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह, स्थिर आणि न्याय्य होण्यासाठी, ग्लोबल साऊथ मधील देशांनी परस्पर सहकार्य आणि एकत्रित कृती करण्याची गरज असून त्याद्वारे ही साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल,असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज दुसर्‍या...18 Nov 2023 / No Comment / Read More »

सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योजकांशी पीयूष गोयल यांनी साधला संवाद

सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योजकांशी पीयूष गोयल यांनी साधला संवादनवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक आणि भारतीय वंशाच्या उद्यम भांडवलदारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताला गुंतवणुकीचे उत्तम स्थान बनवण्यासाठी त्यांच्या कल्पना सामायिक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले. केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी भारतीय स्टार्टअप कार्यक्षेत्राबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मांडला. कृत्रिम बुद्धिमतेसारख्या महत्वाच्या आणि...17 Nov 2023 / No Comment / Read More »