किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– केंद्राने घेतले महत्त्वाचे निर्णय,
नवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तथा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह काही छोट्या बचत योजनांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकारने केलेल्या नव्या नियमांनुसार, आता ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत खाते उघडण्याच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी केवळ एक महिन्याचा होता. मात्र, नव्या नियमांनुसार हा कालावधी दोन महिन्यांचा करण्यात आला आहे.
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एखादी व्यक्ती निवृत्तीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडू शकते. यात, मॅच्युरिटीची तारीख अथवा एक्सटेन्शन मॅच्युरिटीच्या तारखेवर, योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या दराने व्याज मिळेल. याच बरोबर, सार्वजनिक निर्वाह निधी (पीपीएफ) योजनेत खाते वेळेच्या आधी बंद करण्यासंदर्भातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (सुधारणा)- २०२३ असे म्हटले जाऊ शकते. असेही संबंधित अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे.
याशिवाय, राष्ट्रीय बचत योजनेंतर्गत असलेले पैसे, मॅच्युरिटीपूर्वी काढण्यांसंदर्भातील नियमांतही काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार, पाच वर्षांच्या कालावधीसाठी खात्यात ठेवलेली रक्कम, खाते उघडल्याच्या तारखेपासून ४ वर्षांनंतर, मात्र मुदतीपूर्वी काढल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज देणे बंधनकारक राहील.