किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश-हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक!,
नवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – विविध प्रसारण सेवा आणि ओटीटीवरील कंटेंटचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात समाज माध्यम ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. नवे विधेयक मंजूर झाल्यास नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रकाशित होणार्या कंटेंटचे देखील नियमन होणार आहे.
अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्यवसाय सुलभता’ आणि ‘जीवन सुलभते’बाबत दूरदृष्टी ठेवतात. प्रसारण सेवा (नियमन) विधेयकाचा मसुदा समोर आणताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. या नव्या कायद्यामुळे प्रसारण क्षेत्राच्या नियमनासाठी चौकट तयार केली आहे. जुने कायदे आणि नियम जाऊन एकच असा भविष्याच्या विचार करून तयार करण्यात आलेला कायदा अस्तित्वात येईल.
नव्या कायद्यानुसार ‘मजकूर मूल्यमापन समिती’ स्थापन केली जाईल. या समितीमध्ये तज्ज्ञ आणि अधिकार्यांचा समावेश राहील. भविष्याच्या दृष्टिकोनातून नव्या कायद्याचा मसुदा आखण्यात आला आहे. जाहिरात कोड आणि प्रोग्रॅम कोड यामधील उल्लंघनासंबंधी सरकारला सल्ला देण्यासाठी नवीन प्रसारण सल्लागार परिषदेची स्थापना केली जाणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
मजकूर मूल्यमापन समिती
प्रत्येक ब्रॅण्डकास्ट आणि ब्रॅण्डकास्टिंग नेटवर्क ऑपरेटरला मजकूर मूल्यमापन समिती स्थापन करावी लागणार आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ आणि सामाजिक गटातील सदस्यांचा समावेश करावा लागणार आहे. स्व-नियमनावर या कायद्यामध्ये भर देण्यात आला असून, भंग केलेल्यांना दंड करण्याचा अधिकार असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी इशारा देणे, ब्रॅण्डकास्टरला आर्थिक दंड आकारणे, समज देणे यांचा समावेश असेल. गंभीर प्रकरणात तुरुंगवासाची तरतूदही कायद्यात करण्यात आल्याचे समजते.