किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२८ मे) – भारतीय हवामान खात्याने हरियाणा, उत्तर-पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर दिल्लीत पुढील ३ ते ४ दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की अरबी समुद्रातून येणार्या आर्द्रतेमुळे आज (रविवार) वायव्य भारतात मुसळधार पाऊस पडेल आणि ५ दिवस मेघगर्जनेसह वादळ सुरू राहील. हवामान खात्याने उत्तर-पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस आणि इतर भागात वादळी वार्याचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारपासून एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा वायव्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे, खचॄ ने म्हटले आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवर पुढील दोन दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
उत्तर पश्चिम भारत पुढील ४ ते ५ दिवसांत वायव्य भारतात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ मे रोजी उत्तर राजस्थानच्या काही भागात गारपीट होऊ शकते. दिल्लीत विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. २८ मे रोजी उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.ईशान्य भारतात आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील २४ तासांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतात पुढील ३ दिवसांत मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात पुढील २ दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंडमध्ये गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.दक्षिण भारतात पुढील ५ दिवसांत केरळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.- पुढील ५ दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही अशीच स्थिती आहे.-