किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२८ मे) – देशातील नवीन संसद भवनाच्या इमारतीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनात पोहोचले आहेत. सुमारे तासभर चाललेल्या पूजेने सोहळ्याची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, तामिळनाडूच्या विविध मठातील अध्ययनमध्ये आधीच पोहोचले आहेत. येथे हवन-पूजा सुरू झाली. पंतप्रधानांनी नवीन संसद देशाला सुपूर्द कले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी हवन करण्यात आले. मंत्रोच्चाराच्या दरम्यान, पीएम मोदी पूर्ण विधीसह पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यादरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही त्यांच्यासोबत नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी हवनपूजेला बसले होते. हा हवन-पूजेचा कार्यक्रम सुमारे तासभर चालला. तामिळनाडू येथील अध्यानम संताच्या मंत्रोच्चाराने हवनाचा विधी संपन्न झाला. हवनानंतर पीएम मोदींनी सेंगोलसमोर पूजा केली. तसेच संसद भवनात सेंगोलची स्थापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विविध अध्यानम संतांचे आशीर्वाद घेतले.
नवीन इमारतीत लोकसभेतील ८८८ आणि राज्यसभेतील ३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. नव्या संसदेबाबत देशात जोरदार राजकारण झाले. जवळपास संपूर्ण विरोधी पक्ष नवीन संसदेच्या उद्घाटनापासून दूर गेला आहे. देशाच्या नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी देशभरातून अनोखे साहित्य गोळा करण्यात आले आहे. जसे नागपूरचे सागवान लाकूड, राजस्थानमधील सर्मथुरा येथील वाळूचा खडक, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील गालिचा, आगरतळा येथील बांबूचे लाकूड आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद व जयपूर येथील अशोक चिन्ह.