किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२६ मे) – मदुराई अधानमच्या २९३ व्या मुख्य पुजार्याच्या वतीने २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी ’सेंगोल’ हा राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला जाईल. मदुराई अधानमचे मुख्य पुजारी श्री हरिहरा देसिका स्वामीगळ यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींचे जागतिक कौतुक झाले आहे आणि देशातील प्रत्येकाला त्यांचा अभिमान आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे, असेही ते म्हणाले.
स्वामीगळ यांनी एएनआयला सांगितले की, ’पंतप्रधान मोदी हे असे नेते आहेत ज्यांना जागतिक स्तरावर प्रशंसा मिळाली आहे. ते लोकांसाठी चांगल्या गोष्टी करत आहेत. त्यांना २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान बनायचे आहे आणि लोकांना मार्गदर्शन करायचे आहे. आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.’ कारण आमच्या पंतप्रधान मोदींचे कौतुक जागतिक नेते म्हणून होत आहे. २८ मे रोजी, जेव्हा पंतप्रधान देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल, जेव्हा पंतप्रधान नवीन संसद भवनात सेंगोल स्थापित करतील. सेंगोल मदुराई अध्यानमचे मुख्य पुजारी सादर करतील. ’नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त मी पंतप्रधान मोदींना भेटेन आणि त्यांना ’सेंगोल’ भेट देईन, असे ते म्हणाले. हे तेच सेंगोल आहे जे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या उपस्थितीत स्वीकारले होते.