किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलराजपिपला, (२६ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार्या नवीन संसद भवनाच्या लोकार्पणावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराचा हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असून, राजकारण करण्याची एक मर्यादा असते, अशी टीका परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केली. दोन दिवसीय गुजरात दौर्यावर असलेले जयशंकर नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला शहरात पत्रकारांशी बोलत होते. संसदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण हा सण संपूर्ण देशाने साजरा केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसदेचे लोकार्पण झाले पाहिजे. कारण, त्या केवळ देशाच्या प्रमुख नाहीं तर, संसदेचा अविभाज्य भागदेखील आहेत. यावर जयशंकर म्हणाले, माझा विश्वास आहे की, नवीन संसद भवनाचे लोकार्पण हा लोकशाहीचा सण म्हणून साजरा केला पाहिजे. तो वादाचा विषय होऊ नये. काही लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला वाटते की, राजकारण करण्याची मर्यादा असली पाहिजे. किमान अशा प्रसंगी संपूर्ण देशाने एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे. परराष्ट्र मंत्री त्यांच्या गुजरात दौर्यात खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या नर्मदा जिल्ह्यातील चार गावांना भेटी देणार आहेत.