किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादललखनौ, ११ डिसेंबर – पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथ येथे काढण्यात येणार्या विविध राज्यांच्या चित्ररथांमध्ये अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरावरील चित्ररथाचा समावेश राहणार आहे. राममंदिराची भव्य कलाकृतीही यावेळी सादर करण्यात येणार आहे.
अयोध्येतील राममंदिर किती भव्यदिव्य राहणार आहे, याची प्रचिती या चित्ररथाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला येणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राममंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी, ‘राम सर्वांचेच’ हा संदेश दिला होता. आता अयोध्यादेखील सर्वांचीच आहे. अयोध्या केवळ श्रीरामांची जन्मभूमीच नसून, अनेक धर्मीयांच्या आस्थेचे केंद्र आहे, हा संदेश योगी आदित्यनाथ सरकार देणार आहे. रामराज्यावर आधारित आणि राममंदिराची भव्यता दर्शविणारा चित्ररथ याच अनुषंगाने तयार केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर हा चित्ररथ सर्वांचेच लक्ष वेधणारा असेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.
हा चित्ररथ तयार करण्याचे काम अतिशय जोरात सुरू असून, यात अयोध्येतील सांस्कृतिक परंपरा, कला आणि इतर मुद्यांवर भर देण्यात येत आहे. सोबतच, योगी सरकारतर्फे २०१८ पासून सुरू करण्यात आलेल्या भव्य दीपोत्सवाचे दर्शनही घडविण्यात येणार आहे. रामलीलेसोबतच मृदंगसम्राट या नावाने प्रसिद्ध असलेले पागलदास यांच्या आयुष्यावरही चित्ररथ तयार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.