किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलधोरणात्मक संबंध मजबूत करण्यावर भर : जनरल रावत,
नवी दिल्ली, ११ डिसेंबर – भारतीय समुद्रात विविध देशांच्या १२० युद्धनौका सध्या वेगवेगळ्या मोहिमांसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. भारतासोबत धोरणात्मक सागरी संबंध मजबूत करण्यावर अनेक देश भर देत असल्याचेच हे संकेत आहेत, असे प्रतिपादन तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी केले.
जागतिक सुरक्षा परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करताना रावत बोलत होते. अनेक देशांना भारतासोबत चांगले आणि मैत्रिपूर्ण संबंध हवे आहेत. यामुळेच भारतीय समुद्रात या देशांनी विविध प्रकारच्या मोहिमांसाठी आपल्या युद्धनौका पाठविल्या आहेत. बदलती भौगोलिक स्थिती आणि काही देशांकडून निर्माण होत असलेला धोका, या पृष्ठभूमीवर या देशांसोबतचे वाढते संबंध भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे रावत यांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणात युद्धनौका तैनात असतानाही या भागात शांतता आहे. यातील बहुतांश देश आशिया उपखंडातील नसतानाही, तणाव निर्माण होणार नाही, याची ते काळजी घेत आहेत, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या भागात मागील काही महिन्यांपासून चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झालेली आहे. आमच्या शेजारील देश राष्ट्रीय सुरक्षेला सातत्याने धोका निर्माण करीत असतानादेखील आम्ही हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू, असे ते म्हणाले.