किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सर्वोच्च न्यायालयाने चार राज्यांना फटकारले,
नवी दिल्ली, (०७ नोव्हेंबर) – राजधानी दिल्ली गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषण संकटाचा सामना करीत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा वायू गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे. या प्रश्नावर प्रत्येकवेळी राजकीय लढाई कशासाठी, असा सवाल करीत हा केवळ दोषारोपाचा खेळ आहे, अशा शब्दांमध्ये पंजाबसह दिल्ली, उत्तरप्रदेश आणि राजस्थान सरकारला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तसेच शेतात पाचट आणि गवताच्या पेंड्या जाळणे थांबवण्याचा निर्देशही संबंधित राज्यांना दिला.
वायू प्रदूषण प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण आणि सणांच्या निमित्ताने फटाक्यांची खरेदी, विक्री आणि पाचट जाळण्याच्या संदर्भात दाखल याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ज्यामध्ये न्यायालयाने दिल्लीच्या शेजारील राज्यांवर कडक शब्दांत टिपण्णी केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, प्रत्येकवेळी ही राजकीय लढाई असू शकत नाही. हा केवळ दोषारोपाचा खेळ सुरू आहे. पंजाबमध्ये अजूनही शेतात पाचट आणि गवताच्या पेंड्या जाळल्या जात आहेत, याचा परिणाम दिल्ली-एनसीआरसह शहरातील हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. यामुळे या शहरातील वायू प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हे थांबवण्याचा निर्देश न्यायालयने दिला आहे.
आम्हाला शेतातील पेंड्या जाळणे थांबवायचे आहे. तुम्ही ते कसे करणार आम्हाला माहीत नाही, पण हे थांबायला हवे. यासाठी ताबडतोब काही तरी केले पाहिजे, असा निर्देश न्यायालयाने पंजाब सरकारला दिला. ताबडतोब पेंड्या जाळणे थांबवण्यासाठी कार्यवाही करा, असा निर्देश पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि राजस्थान सरकार दिला. राजस्थानातील फटाक्यांची विक्री, खरेदी आणि वापरासंदर्भातील याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू झाली. यावेळी याचिकाकर्त्याने आम्ही नवीन काहीही मागत नाही. आम्हाला फक्त जुन्या आदेशाचे पालन करायचे आहे. याचिकाकर्त्याने फटाके वाजवण्यासाठी वेळ निश्चित करण्याची आणि शाळा व रुग्णालयांसारख्या ठिकाणांपासून दूर फटाके जाळण्याच्या सूचना देण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, न्यायालयाने राजस्थानला जुन्या आदेशाचे पालन करण्याचे आणि उत्सवादरम्यान फटाके न फोडण्याचा निर्देश दिला. विशेषत: सणांच्या काळात प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही म्हटले आहे. दरम्यान, वाढते प्रदूषण बघता नोएडामध्ये जिल्हाधिकार्यांनी शाळांना १० नोव्हेंबर सुटी जाहीर केली आहे.