किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– मनोज सिन्हा आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण
श्रीनगर, (०७ नोव्हेंबर) – जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांचा हा पुतळा उत्तर काश्मीर जिल्ह्यात लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्स मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये बसवण्यात आला आहे. यावेळी पुजार्याकडून विशेष पूजाही करण्यात आली. हा जिल्हा पाकिस्तानला लागून आहे.
हा पुतळा शूर सुरक्षा दलांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरचे संबंध खूप जुने असून हे संबंध अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे आणि यावेळी त्यांनी ’आम्ही पुणेकर’ आणि भारतीय लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे अभिनंदन केले. शिवरायांचा हा पुतळा जनतेसाठी आणि लष्करासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले.
सिन्हा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, लहानपणापासूनच प्रतिभासंपन्न असलेल्या शिवाजीने शत्रूंवर आपल्या संस्मरणीय विजयांनी भारताचा नवा इतिहास लिहिला. आपल्या लष्करी पराक्रमाने आणि नैतिक सामर्थ्याने, शिवाजीने लाखो भारतीयांना संघटित केले आणि मराठा साम्राज्याचे सार्वभौमत्व सुरक्षित केले, लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले. त्यांची सार्वभौमिक आणि शाश्वत मूल्ये आजही प्रासंगिक आहेत आणि सामाजिक समता आणि शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत.