किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– केंद्र सरकारचा फुटीरतावाद्याला दणका,
– दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत प्रतिबंधित संघटना घोषित,
नवी दिल्ली, (२८ डिसेंबर) – फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरच्या एका गटाला केंद्र सरकारने बुधवारी कठोर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत प्रतिबंधित संघटना घोषित केले. देशात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमधील देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग लक्षात घेता, ही कारवाई करण्यात आली, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. देशाचे ऐक्य, सार्वभौमत्व आणि एकतेच्या विरोधात कारवाया करणार्यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा मोदी सरकारचा स्पष्ट संदेश असल्याचे अमित शाह यांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत मुस्लिम लीगवर बंदी घातल्याची घोषणा करताना सांगितले.
बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मसरत आलम गटाच्या मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर बेकायदेशीर संघटना घोषित केली आहे. ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, दहशतवादी कारवायांचे समर्थन करीत आहेत आणि लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यास प्रवृत्त करीत आहेत, असे शाह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. संघटनेचे सदस्य फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, पाकिस्तान आणि त्याच्या संघटनांंसह विविध स्रोतांद्वारे निधी गोळा करणे, दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे आणि जम्मू-काश्मिरातील सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात गुंतलेले आहेत. गृह मंत्रालयाने यावर जोर दिला की, मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर आणि त्याचे सदस्य देशाच्या संवैधानिक अधिकार आणि देशाचा अनादर करतात. त्यांच्या बेकायदेशीर कारवाया भारताची अखंडता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सांप्रदायिक सौहार्दाचे नुकसान होते.
मसरत आलम पाकिस्तान समर्थक
मसरत आलम भट हा त्याच्या भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक प्रचारासाठी ओळखला जातो. सय्यद अली शाह गिलानीच्या मृत्युनंतर भट हुर्रियत कॉन्फरन्सच्या कट्टर गटाचा अध्यक्ष झाला. सध्या तो तुरुंगात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचनेत नमूद केले आहे की, मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरचे ×उद्दिष्ट जम्मू-काश्मीरला भारतापासून स्वातंत्र्य मिळवून देणे, ते पाकिस्तानमध्ये विलीन करणे आणि इस्लामिक राज्य स्थापन करणे आहे.