किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन नवी दिल्लीत आयोजित जी-२० परिषदेच्या निमित्ताने चार दिवस भारतात मुक्कामी असतील. ते मुक्काम करणार असलेल्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे आठ लाख रुपये असल्याची माहिती आहे. निश्चितच दिवसाचे भाडे सुद्धा वेगळे असेल, असे सूत्र सांगतात. भारताला जी-२० परिषदेच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला असून, तीन दिवस पार पडणार्या विविध बैठकांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, बि‘टनसह १९ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यासाठी राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात ३० पेक्षा अधिक हॉटल्समध्ये विदेशी पाहुण्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे.
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत भारतात असतील. ते आयटीसी मौर्या शेरेटनमध्ये १४ मजल्यावरील चाणक्य नावाच्या सुटमध्ये मुक्काम करतील. हा सूट ४ हजार ६०० वर्ग फूट क्षेत्राचा असून, यात अभ्यासिका, मिनी, लिव्हिंग रूम, जिम, बैठक कक्ष, डायनिंग एरिया, स्वागत कक्षाचा समावेश आहे. या सुविधांच्या प्राप्तीसाठी एका रात्रीसाठी आठ लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. बायडेन १४ व्या मजल्यावर थांबणार असले तरी, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मजल्यावर अमेरिकन सुरक्षा यंत्रणेचे सीक्रेट सर्व्हिस कमांडो सज्ज असतील. त्यांना कक्षापर्यंत पोहोचविण्यााठी एक विशेष लिफ्ट तयार करण्यात आली आहे.
उल्लेखनीय असे की, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याच चाणक्य कक्षात मुक्काम केला होता. त्याआधी पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिटंन, जिमी कार्टर यांनी सुद्धा आयटीसी मौर्यामध्येच मुक्काम केला होता. दरम्यान, विदेशी पाहुण्यांच्या मुक्कामासाठी ताज मानसिंग, ताज पॅलेस, हॉटल ओबेरॉय, हॉटेल ललित, द लोधी, ली मेरिडियन, हयात रिजन्सी, शांगरी-ला, लीला पॅलेस, रोसेट हॉटल, द विवांता (सूरजकुंड), आयटीसी ग्रॅण्ड (गुरुग्राम), ताज सिटी सेंटर (गुरुग्राम), हयात रिजन्सी (गुरुग्राम), द ओबेरॉय (गुरुग्राम), वेस्ट आयएनएन (गुरुग्राम), क्राऊन प्लाजा (ग्रेटर नोएडा) या ठिकाणी सुद्धा कडक सुरक्षेत व्यवस्था करण्यात आली आहे.