किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– अॅड. हरीश साळवे यांचे ‘एक देश, एक निवडणूक’वर मत,
नवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्यावरून देशभरात चर्चा सुरू आहे. यावर मोदी सरकारने एक समितीही स्थापन केली. समितीचे एक सदस्य असलेले ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी एका वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. जे सर्वोत्तम असेल तेच केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर समिती कशी काम करेल, हेही त्यांनी सांगितले.
अॅड. हरीश साळवे म्हणाले, काम अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे. यावर खूप विचार करण्याची गरज आहे. येथे तेच केले जाईल, जे राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल. अद्याप समिती अध्यक्षांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. व्यक्तिशः मी नेहमीच एका निवडणुकीच्या बाजूने असतो. मात्र, समिती दोन्ही बाजू घेईल, सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. सप्टेंबरमध्ये बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हा अजेंडा समाविष्ट होण्याची शक्यता साळवे यांना विचारली असता ते म्हणाले, सप्टेंबरच्या अजेंड्यात हा विषय असण्याची शक्यता नाही. हा राजकीय मुद्दा आहे, त्यामुळे संसदेत यावर नक्कीच चर्चा होऊ शकते.
जे राजकारणात आहेत, ते राजकारणावर बोलू शकतात. भाजपाला काय करायचे आहे, ते मला माहीत नाही. भारतात अध्यक्षीय पद्धती असावी का, हा प्रश्न याआधीही चर्चेत आला आहे, असे सांगून ते म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या अहवालांद्वारे जमिनीच्या पातळीवरील कामाची माहिती घेत असतो. राजकारणातील सरकार बदलाचा विधानसभेवर काहीही परिणाम होत नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विधानसभा बरखास्त न करता सरकार बदलण्यात आले होते, अशी आठवणही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितली.