किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल-भेदभाव, असमानतेला प्रोत्साहन मिळत असल्याची टीका,
चेन्नई, (०४ सप्टेंबर) – तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रियांक खरगे यांनी समर्थन केले आहे. सनातन धर्म भेदभाव, असमानतेला प्रोत्साहन देणारा असल्याची टीका स्टॅलिन यांनी केली होती. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला संपुष्टात आणण्याची गरज असल्याचे म्हटले होते. यानंतर देशभरातून त्यांच्या वक्तव्याला विरोध होत आहे. अशातच कर्नाटक सरकारमधील मंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे पुत्र प्रियांक यांनी उदयनिधी यांना पाठिंबा दिला.
भेदभाव, समानतेचा पुरस्कार करणारा वा मानवाचा स्वाभिमान नाकारणारा कोणताही धर्म हा धर्म संकल्पेत येत नाही. माझ्या मते, जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, व्यक्तीसोबत माणुसकीचा व्यवहार करीत नाही, तो एक आजार आहे, असे प्रियांक खडगे म्हणाले. यावेळी त्यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र आयोजित केले आहे. सरकारने विरोधी पक्षांची महाआघाडी इंडियावरून देशाचे लक्ष विचलित करण्याची मोहीम सुरू केली आहे. सरकार महामारी, मणिपूर हिंसाचार, चिनी अतिक‘मण या मुद्यांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत नाही.
स्टॅलिन काय म्हणाले …
उदयनिधी स्टॅलिन यांनी मागील दिवसांत एका कार्यक्रमात म्हटले होते की, काही गोष्टींना केवळ विरोध पुरेसा नाही, तर त्यांना मुळातून संपविणे गरजेचे असते. डास, डेंग्यू आजार, मलेरिया, कोरोना अशा काही गोष्टींना आपला केवळ विरोध नाही, तर त्यांना संपविणे गरजेचे आहे. सनातन धर्म सुद्धा याच प्रकारचा आहे.