किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 29.68° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.68° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– ८० देशांना १६ हजार कोटींची शस्त्रविक्री,
नवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – संरक्षण उत्पादनांत भारत आता आत्मनिर्भर बनत आहे. गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या भारत भेटीवर आलेले ब्राझिलियन लष्कराचे कमांडर जनरल टॉमस मिगुएल माईन रिबेरो पाईवा यांनी भारताद्वारे निर्मित शस्त्रास्त्रांत रस दाखवला आहे. पोखरणच्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये जमिनीवरील लढाई व हवाई संरक्षणातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाहून ते सौद्यासाठी इच्छुक आहेत.
केनियाचे संरक्षणमंत्री अडेन ब्रेर डुआलेदेखील भारताकडून नौदल जहाज व लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करू इच्छितात. एक दशकापूर्वी शस्त्र खरेदीबाबत भारत आयातदार देशांच्या यादीत आघाडीवर होता. मात्र, गेल्या सहा वर्षांत संरक्षण क्षेत्रात चित्र बदलले आहे. २०२२-२३ मध्ये भारताने १६ हजार कोटी रुपयांचे स्वदेशी शस्त्रास्त्रे व सुटे भाग ८० देशांना निर्यात केले आहेत. संरक्षण क्षेत्रातील परिवर्तनाची ही कथा एका दिवसातील तयारीचा परिणाम नाही. सरकारने २०२५ पर्यंत १४ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पाच वर्षांत ३५ हजार कोटींच्या निर्यातीची तयारी केली आहे.
स्वदेशीकरणाला २०१६ मध्ये सुरुवात झाली तर पाच लढाऊ विमाने तेजस, ध्रुव हेलिकॉप्टर, एलसीएच लढाऊ हेलिकॉप्टर, अस्त्रे व आकाश क्षेपणास्त्र जगाने पाहिले. भारताने ४०० शस्त्रे व संरक्षण उत्पादनाला नकारात्मक यादीत टाकले. म्हणजे, त्याचे उत्पादन भारतात होईल. डीआरडीओकडून विकसित १५५ एमएएम आर्टिलरी गनचे उत्पादन टाटा व कल्याणी समूह करीत आहेत. इतर देशांशी संरक्षण सौद्यात पहिली अट देशी कंपनीसोबत संयुक्त प्रकल्पाची आहे. ५६ सी-२९५ एमडब्ल्यू ट्रान्सपोर्ट विमानासाठी एअरबसशी सौदा केला. तीन वर्षांत १६ विमाने स्पेनहून भारतात येतील. बाकी ४० बडोद्यातील एअरोस्पेस कॉम्प्लेक्समध्ये तयार होतील.