किमान तापमान : 28.15° से.
कमाल तापमान : 28.71° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.71° से.
27.47°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल-काँग्रेस बहिष्कार घालून हैदराबादला काढणार पळ!,
नवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन येत्या १८ ते २२ सप्टेंबर अशा पाच दिवसांसाठी बोलावले आहे. त्याची अधिकृत विषय पत्रिका सरकारने अद्याप जाहीर केली नसली, तरी या अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण हा मुख्य विषय राहण्याची शक्यता आहे. त्यातच अधिवेशनावर बहिष्कार घालून अख्खी काँग्रेस हैदराबादला पळून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता आहे. यात सरकार ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करून घेणार असल्याची माहिती आहे. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत आधीच मंजूर झाले आहे, पण मतभेदांमुळे लोकसभेत मंजूर व्हायचे राहिले आहे. ते लोकसभेत मंजुरीसाठी ठेवण्याचा मोदी सरकारचा मनसूबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचवेळी काँग्रेस मात्र अधिवेशनावर बहिष्कार घालून हैदराबादला पळ काढण्याच्या बेतात असल्याची माहितीही समोर आली आहे.
काँग्रेसने बोलावली तीन दिवसीय बैठक
१६, १७ आणि १८ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये काँग्रेस कार्यकारिणी, काँग्रेस विस्तारित कार्यकारिणी आणि काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ नेत्यांची महत्त्वाची बैठक हैदराबादमध्ये होत आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रपरिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी २३ सदस्यांची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. तिची पहिली बैठक १६ सप्टेंबर रोजी हैदराबादला सुरू होईल.
१७ सप्टेंबर रोजी काँग्रेस विस्तारित कार्यकारणीची बैठक होईल. त्याच दिवशी सायंकाळी काँग्रेस हैदराबादमध्ये महारॅली आयोजित करणार आहे. त्याच्या दुसर्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, विधिमंडळ नेते, प्रदेशाध्यक्ष या सर्वांना तेलंगणामधील ११९ विधानसभा मतदारसंघांमध्ये पाठवून काँग्रेस तिथल्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहे. याच काळात संसदेचे विशेष अधिवेशन भरणार असल्याने काँग्रेसने अप्रत्यक्षपणे सुरुवातीलाच त्याच्यावर बहिष्कार घातल्याचे दिसून येते. कारण, काँग्रेसच्या सर्व खासदारांना १८ सप्टेंबर रोजी तेलंगणातल्या कार्यक्रमाला हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे.