किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– प्राणप्रतिष्ठेकडे जागतिक माध्यमांचेही लक्ष,
नवी दिल्ली, (२२ जानेवारी) – सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा केली. जगभरातील प्रसारमाध्यमांनी आपापल्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम कव्हर केला. ब्रिटिश मीडिया हाऊस बीबीसीने आपल्या मथळ्यात लिहिले, भारताच्या पंतप्रधानांनी पाडलेल्या मशिदीच्या जागी मंदिराचे लोकार्पण केले.
त्याचवेळी कतारी मीडिया हाऊस अल जझिराने राम मंदिराच्या बातमीला ही ठळक मथळा दिला – मोदींनी केले राम मंदिराचे लोकार्पण, मुस्लिमांना त्यांच्या भविष्याची भीती वाढली. अमेरिकन मीडिया हाऊस न्यू यॉर्क टाईम्सने राम मंदिराचे वर्णन पंतप्रधान मोदींच्या हिंदू-प्रथम भारताचा विजय असल्याचे म्हटले आहे. मंदिराचे वादग्रस्त असे वर्णन करताना सीएनएनने लिहिले, भारताच्या मोदींनी वादग्रस्त मंदिराचे लोकार्पण केले. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने लिहिले की, बदलत्या भारताचे प्रतिबिंब पंतप्रधान मोदींनी मंदिराचे लोकार्पण केले.
ब्रिटनचे बीबीसी
बीबीसीने लिहिले, हिंदूंच्या भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनात भारताच्या पंतप्रधानांनी भाग घेतला. त्यांच्याशिवाय चित्रपट कलाकार आणि उद्योगपतींसह हजारो पाहुण्यांनी प्राणप्रतिष्ठेला हजेरी लावली. विरोधकांनी या कार्यक्रमाला विरोध करत पंतप्रधान मोदींवर मंदिराच्या माध्यमातून राजकीय फायदा उठवल्याचा आरोप केला. काही मुस्लिमांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा समारंभाने त्यांच्यासाठी वेदनादायक आठवणी परत आणल्या आहेत.
कतारचे अलजझीरा
अल जझिराने अयोध्येतील एका मुस्लिम महिलेचा हवाला देत लिहिले, मला टोमणे मारण्यात आले. मला पाहताच काही लोक जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागले. त्यांच्यात आक्रमक विजयाची भावना होती. डिसेंबर १९९२ मध्ये हिंदू राष्ट्रवादींच्या जमावाने उद्ध्वस्त केलेल्या मशिदीचा भारतीय मीडियामध्ये उल्लेख नाही.
पाकिस्तानचे डॉन
पाकिस्तानच्या ‘डॉन’ने लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मंदिराचे लोकार्पण केले, जे हिंदू राष्ट्रवादी राजकारणाच्या विजयाचे प्रतिबिंब आहे. सोनेरी पोशाखातील मोदींनी रामाची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी स्थापित केली. ज्या ठिकाणी शतकानुशतके जुनी मशीद उभी होती, त्या जागेवर हे मंदिर बांधण्यात आले आहे, जी १९९२ मध्ये मोदींच्या पक्षाच्या भडकावण्यामुळे लोकांनी पाडली.