किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२६ नोव्हेंबर) – स्थावर मालमत्ता कंपनी सुपरेटक आणि तिच्या प्रवर्तकांच्या विरोधात दाखल बेकायदेशीर सावकारीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने स्थावर मालमत्ता क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या गुरुग्राम परिसरात छापेमारी केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. सुपरटेक कंपनीच्या विरोधात ईडी करीत असलेल्या तपासाच्या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीबाबत वृत्तसंस्थेने विचारलेली माहिती डीएलएफने दिली नाही. या प्रकरणात ईडीने सुपरेटकचा प्रवर्तक आर. के. उर्फ रामकिशोर अरोराला जूनमध्ये अटक केली आहे.
या समूहावर अरोराचे नियंत्रण आहे आणि गुंतवणूकदार तसेच गृहखरेदी करणा्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी बनावट कंपन्यांमध्ये वळता करण्याचा निर्णय त्याने घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ६७० गृहखरेदीदारांची १६४ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुपरटेक कंपनीच्या विरोधात दिल्ली, हरयाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी २६ एफआयआर दाखल केले होते. त्याची दखल घेत ईडीने बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.