किमान तापमान : 30.86° से.
कमाल तापमान : 32.28° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 2.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.28° से.
27.71°से. - 32.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशतीनशे नेते उपस्थित राहणार,
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येत्या रविवारी, ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही बैठक सकाळी साडेनऊपासून सुरू होणार असून, दुपारी साडेचारपर्यंत चालणार आहे. भाजपाची ही एक दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने सुरू होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने समारोप होईल.
या बैठकीला भाजपाचे सुमारे ३०० नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटनमंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य आभासी माध्यमातून एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाईन आणि ऑफलाईन असे संमिश्र असणार आहे.
निवडणुकीची तयारी हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीत पक्षाध्यक्षांचे भाषण होणार असून, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा होणार आहे. यासोबतच एक प्रस्तावही आणला जाईल, ज्यात सर्व राजकीय, आर्थिक आणि परराष्ट्र व्यवहार धोरणाच्या मुद्यांचा समावेश असेल.
भाजपाने उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते या राज्यांमध्ये सातत्याने सभा घेत आहेन. सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी भाजपा कार्यकर्ता परिषदा घेत आहे. अशा स्थितीत ७ नोव्हेंबरला होणारी ही बैठक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.