किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१६ जानेवारी) – जगातील सर्वोत्तम सहा तांदळाच्या वाणांच्या यादीत भारताच्या बासमती तांदळाला पहिले स्थान मिळाले आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे.
फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्ट अॅटलसने जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत भारतीय बासमतीला प्रथम स्थान दिले आहे. या यादीत दुसर्या क्रमांकावर इटलीचा अरबोरियो, तर पोर्तुगालचा कॅरोलिनो तांदूळ तिसर्या क्रमांकावर आहे. टेस्ट अॅटलसने जगातील सर्वोत्तम तांदूळ श्रेणीत टॉप-६ तांदळाच्या वाणांना स्थान दिले. पारंपरिक खाद्यपदार्थ, पाककृती आणि संशोधनांचा आढावा घेणार्या टेस्ट अॅटलस या फर्मने जगातील सर्वोत्तम तांदळांच्या वाणांची यादी जाहीर केली. भारतात उत्पादित होणारा बासमती हा प्रीमियम दर्जाचा सुगंधी तांदूळ आहे, ज्याला जगभरात मोठी मागणी आहे.
टेस्ट अॅटलसने बासमती तांदळाबाबत पोस्टमध्ये लिहिले की, बासमती हा मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेला आणि लागवड केला जाणारा लांब आकाराच्या तांदळाचा प्रकार आहे. या तांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय चवदार आहे. एकदा शिजल्यावर याचे दाणे वेगळे राहतात आणि एकमेकांना चिकटत नाहीत. चांगले आणि सर्वोत्तम बासमती दाणे किंचित सोनेरी रंगाचे असतात.
भारत तांदळाचा प्रमुख निर्यातदार
तांदूळ निर्यातीत भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार बनला आहे. या कालावधीत भारताने विक्रमी २३ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला, जो जागतिक बाजारपेठेतील एकूण तांदळाच्या ४०.८ टक्के आहे. जगभरातील बासमती तांदळाच्या निर्यातीत भारत ६५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो, तर पाकिस्तान ३५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो.
जगातील सर्वोत्कृष्ट तांदळाची यादी
भारत : बासमती
इटली : अरबियो
पोर्तुगाल : कॅरोलिनो
स्पेन : बोम्बा
जपान : उरुचिमाय