किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअमरावती, (१६ जानेवारी) – राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानावर आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश दौर्यात त्यांनी लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात पूजा केली. आंध्र प्रदेश दौर्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी पलासमुद्रम येथे पोहोचले.येथील लेपाक्षी मंदिरात पंतप्रधान मोदींनी भगवान शंकराची पूजा केली. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेले लेपाक्षी मंदिर वीरभद्र मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भगवान शिव त्यांच्या उग्र रूपात उपस्थित आहेत. त्यामुळे या मंदिराला वीरभद्र मंदिर म्हणतात.
या मंदिराविषयी असे म्हटले जाते की हे मंदिर लटकलेल्या खांबांवर आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिराची स्वच्छता केली. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळला रवाना होणार आहेत. पीएम मोदी केरळमध्ये ४ हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.