किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (११ मार्च) – भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले नेते, मग ते कोणत्याही पक्षांचे असो, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यावर कारवाई करताना कायदा आपले काम चोखपणे करेल, असे भाजपाने शनिवारी स्पष्ट केले. भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले आणि विविध केंद्रीय यंत्रणा चौकशी करीत असलेले प्रादेशिक पक्षांचे नेते आता आपल्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करून, भावनिक आवाहन करीत आहे. मात्र, हे सर्व नेते टप्प्याटप्प्याने तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका घेत असल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्ला चढवताना भाटिया म्हणाले की, लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणारे नितीशकुमार आता या लोकांवर कारवाई होत असताना तर्कशून्य बोलत आहेत. मनीष सिसोदिया यांची कोठडीत सखोल चौकशी झाली पाहिजे, ही न्यायालयाने केलेली टिपण्णी अतिशय योग्य होती. लाजीरवाण्या अशा उत्पादन शुल्क घोटाळ्याला गती देण्यात सिसोदिया यांचा मोठा वाटा आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात ते आकंठ बुडाले आहे. कोणी कितीही मोठा असला आणि त्याने भ्रष्टाचार केला असेल तर, त्याच्याविरुद्ध कारवाई होतेच, अशी जनतेची खात्री आहे. भ्रष्टाचार केल्याशिवाय तपास यंत्रणा कुणालाच पकडणार नाही, याची जनतेला खात्री असते, असे भाटिया यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली होती. एकापेक्षा एक अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे तेव्हा समोर आली, तो देशातील सर्वाधिक भ्रष्ट असा कालखंड होता. आता मात्र या मुद्यावर लोक जागृत झाले आहेत. भ्रष्टाचारी मग तो कोणीही असो त्याला धडा शिकवला पाहिजे, अशी जनतेची भावना आहे, असे ते म्हणाले. भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांच्यावर हल्ला चढवताना भाटिया म्हणाले की, इंडो स्पिरीटसशी तुमचे संबंध होते की नाही, हे तुम्हाला जनतेला सांगावेच लागेल. देशातील कोणताही भ्रष्टाचारी कायद्यापेक्षा मोठा नाही. कायदा अतिशय मजबूतपणे आपले काम करेल, असा माझा विश्वास आहे.