किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादल-पीयूष गोयल यांची माहिती,
नवी दिल्ली, (११ मार्च) – जी-२० परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत भारताने ऑस्ट्रेलियाशी असणारे मैत्री संबंध अधिक दृढ केले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही नव्याने मोठ्या होणार्या अर्थव्यवस्था आहेत. दोन्ही देशांनी परस्परातील व्यापार वाढीस प्रोत्साहन देत आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. ३० अब्ज डॉलर्सच्या व्यापार करारावर संतुष्ट असल्याचे स्पष्ट करीत, पुढील पाच वर्षांत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत दोन्ही देशांतील व्यापार वृद्धीचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज भारत दौर्यावर होते. शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांमध्ये भारत-प्रशांत आर्थिक चौकट डब्ल्यूटीओ, क्वाडसार‘या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दोन्ही देशांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे व्यापार व पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांच्याशी व्यापार वृद्धीसंदर्भात चर्चा करण्यात आली. भारत आणि आस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. दोन्ही देशांतील व्यापार वृद्धी ४० ते ५ ० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य अधिकार्यांनी ठेवले आहे. मात्र, पुढील पाच वर्षांसाठी भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान १०० अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी ठवले असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.