किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.19° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (११ मार्च) – तिबेटच्या ६४ व्या तिबेटी राष्ट्रीय उठाव दिनानिमित्त तिबेट समुदायाच्या लोकांनी चिनी सरकारच्या कठोर धोरणे आणि बेकायदेशीर ताबा मिळविल्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेकडो तिबेटी लोकांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी जोरदारपणे मांडली. यावेळी तिबेटी म्हणाले की, चीनने आमच्या मुलांची हत्या थांबवावी. चिनी दूतावासाजवळ जाण्याचा प्रयत्न करणार्या तिबेटींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेलं. तथापि, त्यांना रोखण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी दूतावासापासून सुमारे २ किमी अंतरावर बॅरिकेड्स लावले आणि कलम १४४ लागू केले.
तिबेट युथ काँग्रेसच्या सदस्याने माध्यमांना सांगितले की, आज चीनने तिबेटवर कब्जा केला आहे आणि आम्ही तिबेट चीनपासून मुक्त करण्यासाठी आंदोलन करत आहोत. तर त्याच वेळी तिबेटीयन युवक काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीने सांगितले की, तिबेटी राष्ट्रीय उठाव दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जगभरातील तिबेटी चीनविरोधात आवाज उठवण्याचे काम करत आहेत. तिबेटी युवक काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीने परमपूज्य १४ व्या दलाई लामा यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आणि तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी चीन सरकारच्या विरोधातील निदर्शने दरम्यान प्राण गमावलेल्या तिबेटी शहीदांना अभिवादन केले. त्यांच्याशी एकता व्यक्त केली. सन १९४९ मध्ये चिनी सैन्याने तिबेटवर कब्जा करून आपले सैन्य तैनात केले होते, तेव्हापासून तिबेटला प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागत आहे.