किमान तापमान : 23.43° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.49°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– ‘एडीआर’चा अहवाल,
नवी दिल्ली, (११ मार्च) – २०२१-२२ मध्ये सात राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नांपैकी ६६ टक्क्यांहून अधिक उत्पन्न हे निवडणूक रोखण्यांसार‘या अज्ञात स्रोतांकडून आले होते, ज्याचा वाटा तब्बल ८३ टक्के होता, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) सांगितले. या सात राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप या पक्षांचा समावेश आहे. २०२१-२२ मध्ये या पक्षांनी २,१७२ कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून मिळवले, असे एडीआरने अधिकृत डेटाचा हवाला देत म्हटले आहे. या पक्षांच्या एकूण उत्पन्नापैकी ६६.०४ टक्के उत्पन्न अज्ञात स्रोतांकडून झाले आहे. १,८११ कोटी किंवा ८३,४१ टक्के उत्पादन निवडणूक रो‘यांसार‘या अज्ञात स्रोतांकडून झाले असल्याचे एडीआरने म्हटले आहे.
अज्ञात स्रोत हे पक्षांनी वार्षिक लेखापरीक्षण अहवालात उत्पन्नाचा स्रोत न देता घोषित केलेले उत्पन्न आहे. सध्या राजकीय पक्षांनी २० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणार्या व्यक्ती किंवा संस्था आणि ज्यांनी निवडणूक रोखण्यांद्वारे देणगी दिली आहे, त्यांचे नाव उघड करणे गरजेचे नाही. अशा अज्ञात स्रोतांमध्ये निवडणूक रोखण्यांद्वारे देणग्या, कूपन्सची विक्री, मदतनिधी, विविध उत्पन्न, ऐच्छिक योगदान आणि सभा-मोर्चांच्या योगदानाचा समावेश आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात भाजपाने अज्ञात स्रोतांकडून १,१६१ कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केले, जे अज्ञात स्रोतांकडील राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाच्या ५३.४५ टक्के आहे, असे एडीआरने अहवालात म्हटले आहे. भाजपाचे हे उत्पन्न इतर सहा राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या अज्ञात स्रोतांच्या एकूण उत्पन्नापेक्षा (१,०११.१८ कोटी रुपये) १४९.८६ कोटी रुपये अधिक आहे. तृणमूल काँग्रेसने अज्ञात स्रोतांकडून ५२८ कोटी रुपये उत्पन्न घोषित केले, जे अज्ञात स्रोतांकडून राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या २४.३१ टक्के आहे. २००४-०५ आणि २०२१-२२ दरम्यान राष्ट्रीय पक्षांनी १७,२४९.४५ कोटी रुपये जमा केले. २००४-०५ आणि २०२१-२२ दरम्यान कूपनच्या विक्रीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित उत्पन्न ४,३९८.५१ कोटी रुपये आहे, असे एडीआरने म्हटले आहे.