किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल-मूळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा,
बंगळुरू, (२५ जुलै) – अनेक पिढ्या घडविलेले मदनदास यांचा आज बेंगळुरू येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपचे जेष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज पहाटे सुमारे 5 वाजता बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे इथे अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संघ परिवार आणि समाजमन शोकमग्न आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी म्हणजेच ९ जुलै रोजी मदनदास देवी यांचा जन्म झाला होता त्यांचे मूळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी कॉलेज येथे १९५९ ला प्रवेश घेतला. एम.कॉम. नंतर आयएलएस लॉ कॉलेज मध्ये सुवर्ण पदकासह एलएलबी ची पदवी घेतली. राष्ट्रीय स्तरावर रँक मध्ये सीए चे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात शिक्षण घेत असताना ज्येष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघकार्यात सहभागी झाले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, तत्कालीन संघाचे पदाधिकारी प्रल्हाद अभ्यंकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्याशी वैचारिक चर्चा सुरू होती.
संघ परिवारातील विविध आयामांविषयी विस्तारीत सल्ला मसलत,अनेक पैलूंवर विचारधारेची स्पष्टता घेत राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात संघ कार्यास समर्पित जीवनास सुरुवात झाली. १९६९ पासून संघ प्रचारक.विविध उत्तरदायित्व त्यांच्याकडे होते. साधारणतः १९७५ पासून अभाविप आयामात जबाबदारी करीत परिषदेचे विभाग, प्रदेश आणि क्षेत्रीय स्तरावरील विविध जबाबदाऱ्या सांभाळून ते अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून कार्यरत झाले. पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय- शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील, यासाठी विशेष लक्ष देत ”नींव के पत्थर” प्रमाणे कार्य केले. अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्यात पायाला भिंगरी लावल्यासारखा सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली.