किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, २ नोव्हेंबर – महाराष्ट्रासह देशभरात सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आणखी १४ ठिकाणी जल विमानतळ बनवण्याची योजना सरकारने आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि अहमदाबादमधील साबरमती नदीकिनारी या सेवांची यशस्वी सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, आसाम आणि उत्तराखंडात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
आरसीएस उडान योजनेंतर्गत आणखी १४ ठिकाणी जल विमानतळांचा विकास करण्याचे नियोजन आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने (एमओसीए) आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणास (आयडब्ल्यूएआय) जलविज्ञान सर्वेक्षण करण्याची विनंती केली असून, नंतर प्रवाशांच्या हालचाली सुलभ व्हाव्यात, यासाठी जेट्टी उभारण्यास सहकार्य करण्याचीही विनंती केली आहे, अशी माहिती केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिली. केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले, की गुजरात येथे सी-प्लेन सेवा सुरू झाल्यानंतर गुवाहाटी, अंदमान, निकोबार आणि उत्तराखंडमधील विविध मार्गांवर नियमित सेवा देण्याचे नियोजन आहे. केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयानुसार, १४ जल विमानतळांमध्ये महाराष्ट्रातील इरई धरण, उत्तराखंडमधील टिहरी धरण, आसाममधील गुवाहाटी नदीचा प्रवाह आणि उमरंगो जलाशय, लक्षद्वीपमधील मिनिकॉय आणि कवरत्ती; तर अंदमान व निकोबारमधील हॅवलॉक, नील, लॉंग आणि हटबे बेटांचा, तसेच गुजरातमधील धारोई आणि शत्रुंजय या संभाव्य ठिकाणांचा समावेश आहे.