किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.63° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल-कुटुंबातील आचरणावर दिला भर,
नवी दिल्ली, (१२ मार्च) – महिलांचा सर्वतोपरी सन्मान करण्याचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या सन्मानाविरोधात असलेल्या प्रथा-परंपरांचाही त्याग करण्यात यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. ऑल वूमन बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्या बोलत होत्या.
समाजातील महिलांप्रती सन्मानजनक व्यवहाराचा पाया कुटुंबातच रचला जाणे अपेक्षित आहे. कर्तव्याच्या भावनेतूनच हा व्यवहार आचरणात आणता येतो. माता आणि बहिणींनी आपले पुत्र आणि भावांमध्ये महिलांना सन्मान देण्याची मूल्ये विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमध्ये महिलांबद्दल सम्मान आणि संवेदनशीलतेची संस्कृती अधिक मजबूत करावी, असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
निसर्गाने महिलांना नवा जीव जन्मास आणण्याची अर्थात् आई बनण्याची मोठी शक्ती प्रदान केली. तिच्याजवळ मातृत्वाची क्षमता आहे, तशीच नेतृत्वाचीही क्षमता स्वाभाविकरीत्या अंगभूत आहे. कित्येक सीमा आणि उंबरठे पार करून आव्हांनाचा सामना करीत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले तसेच कीर्ती आत्मसात केली असल्याचे अभिमानास्पद उद्गार राष्ट्रपतींनी काढले. याशिवाय प्रसार माध्यमांनी सुद्धा बातमी, जाहिरात, कार्यक‘म अशांतून महिलांचा सन्मान आणि सुरक्षा पूर्णपणे जपावी, अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.