किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन,
– कोरोनाच्या काळात देशात वाढले संघकार्य,
– पत्रपरिषदेत माहिती देताना सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य. सोबत अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर,
– अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनप्रसंगी भारतमाता पूजन करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे,
पानिपत, (१२ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या छायाचित्राला पुष्प अर्पण केल्यानंतर समालखा येथील पट्टीकल्याणास्थित सेवा साधना व ग्राम विकास केंद्र परिसरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. या बैठकीत देशभरातील ३४ संघटनांचे १,४७४ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, अशी माहिती संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते.
बैठकीचे उद्घाटन सत्र झाल्यानंतर आयोजित पत्रपरिषद डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, २०२५ मध्ये संघ आपल्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण करणार आहे. सध्या ७१,३५५ ठिकाणी प्रत्यक्ष कार्य करून संघ सामाजिक परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी शताब्दी वर्षात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे लक्ष्य आहे. २०२० मध्ये आलेल्या कोरोना संकटानंतर संघाचे काम वाढले आहे. २०२० मध्ये ३८,९१३ ठिकाणी ६२,४९१ शाखा, २०,३०३ ठिकाणी साप्ताहिक मिलन आणि ८,७३२ ठिकाणी मासिक मंडली सुरू होत्या. २०२३ मध्ये ही संख्या वाढून ४२,६१३ ठिकाणी ६८,६५१ शाखा, २६,८७७ ठिकाणी साप्ताहिक मिलन आणि १०,४१२ ठिकाणी मासिक मंडलीपर्यंत पोहोचली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून देशभरात ९११ जिल्हे आहेत, त्यापैकी ९०१ जिल्ह्यांमध्ये संघाचे प्रत्यक्ष कार्य सुरू आहे. ६,६६३ प्रखंडांपैकी ८८ टक्के प्रखंडांमध्ये, ५९,३२६ मंडळांपैकी २६,४९८ मंडळांमध्ये संघाच्या प्रत्यक्ष शाखा लागतात. शताब्दी वर्षात संघाचे कार्य वाढवण्यासाठी संघाचे नियमित प्रचारक आणि विस्तारक यांच्या व्यतिरिक्त १३०० अतिरिक्त कार्यकर्ते दोन्ही वर्षांसाठी शताब्दी विस्तारक म्हणून कामाला लागले आहेत, अशी माहिती सहसरकार्यवाह वैद्य यांनी दिली.
संघाच्या शाखांमधून व्यक्ती घडविल्या जातात
भारताचा संपूर्ण समाज एक आहे, सर्व समान आहेत, सर्व माझे आपले आहेत, समाजासाठी मला काही देणे लागते, अशा विचारांची अनुभूती व संस्कार संघाच्या शाखेतून येतात. संघाचे स्वयंसेवक आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून आणि आपल्या खिशातील पैसा खर्च करून समाज परिवर्तनात योगदान देत, संघ कार्याचा विस्तार करतात. संघाच्या शाखांमधून व्यक्ती घडविल्या जातात. पुढे जाऊन ही व्यक्ती समाजात राष्ट्रीय विचार जागृत करून व समाजाला सोबत घेऊन समाज परिवर्तनाची भूमिका बजावत असतात, असे सांगून डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, आज संघाप्रती लोकांचा विश्वास व आकर्षण वाढत आहे. लोक संघ शोधतात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संघासोबत जोडून घेण्यासाठी अर्ज करतात.
२०१७ ते २०२२ पर्यंतच्या कार्यकाळात ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमातून संघाकडे ७,२५,००० अर्ज आले होते. यातील बहुसं‘य २० ते ३५ वयोगटातील युवक आहेत, ते समाजसेवेसाठी संघात सहभागी होऊ इच्छितात. दैनिक शाखांबाबतही तरुणांची आवड वाढत आहे. संघाच्या ६० टक्के शाखा या विद्यार्थ्यांच्या शाखा आहेत. गेल्या वर्षभरात १ लाख २१ हजार १३७ तरुणांनी संघाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. आगामी वर्षाच्या योजनेनुसार देशभरात संघ शिक्षणाचे १०९ शिक्षण वर्ग आयोजित केले जातील, ज्यात सुमारे २० हजार स्वयंसेवक शिक्षण घेण्याचा अंदाज आहे. संघाच्या शिक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. वैद्य यांनी सांगितले की, संघाच्या प्रथम वर्षात १५ ते ४० वयोगटातील स्वयंसेवक, द्वितीय वर्ष १७ ते ४० वयोगट आणि तृतीय वर्षासाठी २५ ते ४० वर्षे वयोगटातील स्वयंसेवक प्रशिक्षण घेतात. ४० वर्षांवरील स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळावर प्रस्ताव पारित होणार
भगवान महावीर परिनिर्वाणाचे २५५० महोत्सवी वर्ष आहे, आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्माचे २०० वे वर्षे आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या तिन्ही संदर्भात प्रतिनिधी सभेत वक्तव्य पारित होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृतकाळ लक्षात घेऊन प्रस्तावही पारित केला जाणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.