किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.28°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील सैनिकांसोबत साजरी करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून आजतगायत मोदी प्रत्येक दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. देशातील वेगवेगळ्या भागात तैनात असणार्या सैनिकांकडे ते जातात आणि प्रत्येक दिवाळीला देश तुमच्यासोबत आहे, असा संदेश देतात.
देशातील नागरिक जेव्हा घरी दिवाळी साजरी करीत असतात, तेव्हा सीमेवरील जवान मात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत असतो. त्यामुळे दिवाळी त्या सैनिकांच्याच साथीने साजरी करण्याची कल्पना मोदी २०१४ पासूनच राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथे तैनात असणार्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
मोदी गुरुवारी दिल्लीहून श्रीनगर मार्गे राजौरीत दाखल होणार असून, तिथे जवानांसोबत दिवाळीचा आनंद घेणार आहेत. यावेळी ते सैनिकांना मार्गदर्शन करणार असून, त्यांच्यासाठी मिठाई आणि फराळ घेऊन जाणार आहेत. पंतप्रधानांच्या दौर्याच्या पृष्ठभूमीवर जम्मू-काश्मिरात शोधमोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. दहशतवादी लपून बसण्याच्या सर्व संभाव्य ठिकाणांवर धाडी टाकण्यात येत असून, कुठलाही घातपात होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.