किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपंतप्रधानांचे जिल्हास्तरीय योद्ध्यांना आवाहन,
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – कोरोना आता बराच नियंत्रणात आला आहे, पण अफवा आणि अपप्रचार अजूनही सुरूच आहे. या अफवांविरोधात लढा द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी जिल्हास्तरीय कोरोना योद्ध्यांना केले. आता घराघरांत लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याचेही पंतप्रधानांनी जाहीर केले.
पंतप्रधान मोदी यांनी आज आभासी माध्यमातून देशातील कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा ५० टक्क्यांपेक्षा कमी देण्यात आलेल्या आणि दुसर्या लसीची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला आभासी पद्धतीने उपस्थित होते. सोबतच महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
देशात लसीकरणाच्या मोहिमेला आणखी वेग द्यायचा आहे. आता ‘हर घर टीका, घर घर टीका’ याअंतर्गत लसीकरण मोहीम चालवली जाईल. लसीकरणासाठी धर्मगुरूंची मदत घ्या. धर्मगुरूंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल करा. बिरसा मुंडा जयंतीला आदिवासीबहुल भागात विशेष लसीकरण मोहीम हाती घ्या, असे आवाहन मोदी यांनी केले.
प्रत्येकाने घ्यावी लस
घरोघरी जाऊन लस दिली जात असताना पहिल्या मात्रेसह दुसर्या मात्रेवरदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यावर आपण हलगर्जीपणा करतो. आता लस कशाला घ्यायची, अशी मानसिकता निर्माण होते. या मानसिकतेतून बाहेर या आणि लस घ्या, असे पंतप्रधान म्हणाले.
१०७ कोटी लसीकरणाचा गाठला टप्पा
देशात मंगळवारी रात्रीपर्यंत १०७ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी एकाच दिवशी ३७,३८,५७४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
धोका टळलेला नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, पण धोका अजूनही टळलेला नाही. आजार आणि शत्रू या दोघांना कधीच दुर्लक्षित करू नका. त्याचा पूर्णपणे खात्मा करेपर्यंत आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे माझे तुम्हाला आवाहन आहे की, एका क्षणासाठीही निष्काळजीपणा दाखवू नका. कोरोना संपला, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांविरोधातही लढा द्यायचा आहे. जनतेत जागृती निर्माण करणे हा या लढ्यातील सर्वोत्तम उपाय आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.