किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली,
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीची बम्पर भेट देत पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी अर्थात् अबकारी करात कपात केल्याची घोषणा आज बुधवारी केली. पेट्रोलवरील अबकारी कर ५ रुपयांनी, तर डिझेलवरील अबकारी कर १० रुपयांनी घटवण्यात आला. पेट्रोल-डिझेलचे नवीन दर उद्या गुरुवारपासून लागू होतील.
पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील अबकारी कर दुपटीने कमी करण्यात आला आहे. येत्या रबी हंगामात शेतकर्यांना यामुळे चालना मिळेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणार्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करावी, अशी विनंती केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनातून राज्यांना केली आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अलिकडच्या आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किमती वाढल्या. त्यामुळे महागाईचा दबावही वाढला. ऊर्जेच्या सर्वच प्रकारांत तुटवडा निर्माण झाल्याचे आणि त्याच्या वाढलेल्या किमतींचा अनुभव जग घेत आहे, असे केंद्र सरकारने निवेदनात म्हटले आहे.
देशात ऊर्जेची कमतरता भासणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेलची गरज पूर्ण करण्यासाठी, ते पुरेशा प्रमाणात नागरिकांना उपलब्ध होईल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले आहेत. इंधन आधारित चलनवाढीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते. या चलनवाढीमुळे दैनंदिन किराणा मालापासून ते विलासी उत्पादनांच्या किमती वाढतच राहतील व यामुळे ग्राहकांची मागणी कमी होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
वाढत्या चलनवाढीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेत्या कमी व्याजदराची व्यवस्था राखण्याच्या योजनेलाही धोका निर्माण होऊ शकतो. कमी व्याजदरामुळे कोरोनाच्या दोन लाटांदरम्यान आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत मिळाली आहे.